जि.प.प्राथमिक शाळा कनेरसर येथे साने गुरुजी जयंती साजरी

राजगुरूनगर
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई,जिल्हा समिती पुणे ग्रामीण यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेरसर येथे साने गुरुजी जिल्हा समिती ग्रामीण चे कार्यकारिणी सदस्य श्री. संदिप म्हसुडगे(गुरुजी)यांनी बाल मेळाव्याचे आयोजन केले होते.

या बालमेळाव्यास अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष श्री. शामराव कराळे (गुरूजी),कनेरसर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.सुनिताताई केदारी, पूर गामपंचायत च्या सरपंच सौ.प्रतिभाताई गावडे, कनेरसर केंद्रप्रमुख मा.श्री.बाळासाहेब गावडे साहेब, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब दौंडकर, सदस्य श्री.चंद्रकांत दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. चांगदेव झोडगे, हजारेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मणराव मिडगुले सर, श्री. गुलाबराव हजारे सर, कनेरसर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. अंजली शितोळे मॅडम, श्रीम.सारिका राक्षे मॅडम, श्रीम.शुभांगीताई जाधव मॅडम, जालिंदरनगर शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदिप म्हसुडगे सर,जालिंदरनगर, हजारेवस्ती, कनेरसर शाळेतील विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती, साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली, त्यानंतर खरा तो एकची धर्म ही साने गुरुजी यांची प्रार्थना सामुहिक रीत्या तालासुरात गायन करण्यात आली.
अखिल भारतीय कथामालेचे अध्यक्ष श्री. शामराव कराळे सर यांनी साने गुरूजीच्या जीवनावर आधारित गोष्टी सांगितल्या, शालेय विद्यार्थ्यांन ची भाषणे झाली. पूर गामपंचायत सरपंच सौ.प्रतिभाताई गावडे यांनी मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रत्येक शाळेत साने गुरूजी कथामालेचे आयोजन व्हावे असे मत व्यक्त केले.कनेरसर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सारिका राक्षे मॅडम यांनी साने गुरुजी यांचा जीवनपट उलगडून सांगितला.

या वेळी जि.प.प्राथ.शाळा हजारेवस्ती शाळेत अजीव कथामाला शाखा स्थापन करण्यात आली.तसेच साने गुरूजी जयंतीचे औचित्य साधून जि.प.प्राथमिक शाळा कनेरसर या शाळेस श्री. संदिप म्हसुडगे सर यांच्या वतीने साने गुरूजींची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली.

मुलांचे मनोरंजन करण्यासाठी सुप्रसिद्ध जादूगार श्री.प्रकाशजी शिरोळे यांचे जादूचे प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन कनेरसर शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम अंजली शितोळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षिका. सारिका राक्षे मॅडम यांनी केले. शेवटी सर्व मुलांना खाऊ वाटप करून, सर्वांचे आभार उपक्रमशील शिक्षिका श्रीम. शुभांगीताई जाधव यांनी मानले

Previous articleसरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय मजदूर संघाचा २८ डिसेंबर रोजी विधानसभा वर मोर्चा
Next articleलोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिपक म्हस्के आणि ज्योती मोकळ समाजभूषण गुण गौरव पुरस्काराने सन्मानित