हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे शिवनेरी किल्ल्यावर प्लास्टिक मुक्त अभियान

राजगुरुनगर – जागतिक प्लास्टिक मुक्त दिनानिमित्त शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन, राजगुरूनगर यांच्या वतीने प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले.

यावेळी तीन पोती प्लास्टिक कचरा फाउंडेशनच्या सभासदांनी गोळा केला.फाउंडेशन च्या वतीने खेड तालुक्यांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी गड किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ किल्ले शिवनेरी वर स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला.

आपल्या पूर्वजांच्या परक्रमाची साक्ष देणारे गड किल्ले या पवित्र वास्तू असून त्यांचे योग्य रीतीने जतन करणे, तेथे स्वच्छता राखणे हे आपले परम कर्तव्य आहे. ह्या हेतू साध्य करण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन ने सदर अभियान राबविले.

या स्वच्छता मोहीमेत अॕड मनीषा पवळे , बाळासाहेब सांडभोर , राजन जांभळे , सुनिल वाळुंज , दिलीप होले , संतोष सांडभोर , मधुकर गिलबिले , राहुल वाळुंज , राहुल मलघे , उत्तम राक्षे , आकाश बोंबले डॉ.नीलम गायकवाड , संपदा सांडभोर , ऍड. साधना बाजारे , शिल्पा बुरसे , संगीता तनपुरे , नाझनिन शेख यांनी सहभाग घेतला.

यावेळी जुन्नर चे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे ,वन अधिकारी रमेश खरमाळे, डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई , जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव आरती ढोबळे , जिजाऊ ब्रिगेड जुन्नर तालुका अध्यक्षा चित्रा कोकणे , रुपश्री सोशल फाउंडेशन च्या अध्यक्षा अश्विनी नवले आदी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी मंदार जावळे यांनी फाउंडेशनच्या सर्व संचालकांचा सत्कार करून भोजन व्यवस्था केली.

Previous articleसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांची बार्टीला भेट
Next articleबोगस सोयाबीन बियाणे विक्री करताना स्टिंग ऑपरेशन करून दोघे जण ताब्यात