बोगस सोयाबीन बियाणे विक्री करताना स्टिंग ऑपरेशन करून दोघे जण ताब्यात

शनारायणगाव : ( किरण वाजगे)

बोगस सोयाबीन बियाणे विक्री करत असताना जुन्नर तालुका कृषी विभाग व जुन्नर तालुका मनसेच्या वतीने स्टिंग ऑपरेशन करून दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील शेतकरी दत्तात्रय तुकाराम वऱ्हाडी यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे बोगस सोयाबीन बियाणे संदर्भात केलेल्या तक्रारीस अनुसरून तालुका कृषी अधिकारी निलेश बुधवंत तसेच जिल्हास्तरीय इन्स्पेक्टर यांच्या तर्फे महाराजा ५५५ या नावाने सोयाबीनची २० किलो बॅग प्रति ३२०० रुपये याप्रमाणे स्थानिक शेतकरी दत्तात्रय तुकाराम वर्हाडी यांना विक्री करत असताना स्टिंग ऑपरेशन करून संबंधित दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका नामांकित कंपनीच्या नावाखाली बोगस बियाणे चा ब्रँड बनवून विक्री करत असताना तसेच रक्कम स्वीकारत असताना संबंधित दोघा व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

यावेळी तक्रारदार दत्तात्रय तुकाराम वर्हाडी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, मनसेचे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेळके, मनसेचे तालुक्यातील पदाधिकारी, बाधित शेतकरी आणि संबंधित यंत्रणा उपस्थित होते. अशाप्रकारे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या व्यक्तीमुळे तालुक्यातील चांगल्या प्रतीचे बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांचे नाव विनाकारण खराब होत आहे. बियाणांची विक्री व्हावी शेतकरी आणि विक्रेता यांच्यामधील विश्वास तुटू नये यासाठी विक्रेत्यांनी सर्व कायद्यांचे पालन करून बियाणांची विक्री करावी असे मत मनसेचे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेळके यांनी व्यक्त केले. तसेच बाधित शेतकरी दत्तात्रय तुकाराम वर्हाडी यांनी देखील बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असल्याचे सांगितले.

विनापरवाना बियाणे विक्री करणारे आणि शेतकऱ्यांना नाहक वेठिस धरणारे विक्रेते आढळल्यास जुन्नर तालुका क्रुषी अधिकारी, शेतकरी संघटना यांना संपर्क करावा असे आवाहन क्रुषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

Previous articleहुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे शिवनेरी किल्ल्यावर प्लास्टिक मुक्त अभियान
Next articleदारू वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ५९ लाखांचा मुद्देमाल जप्त