Home Blog Page 100

भाजपाकडून दिव्यांगांना व्हिलचेअर, श्रवण यंत्रे व कृत्रिम फूटचे वाटप

घोडेगाव : –
अटल बिहारी वाजपेयी विचारमंच पुणे जिल्हा, समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था आणि भारतीय जनता पक्ष आंबेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी घोडेगाव येथील अमित पॅलेस येथे साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्हा पुनर्वसन केंद्र औंध हॉस्पिटल यांचे मार्फत दिव्यांग बांधवांना 40 व्हील चेअर, 20श्रवण यंत्रे व कृत्रिम पायाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी ह.भ.प पांडुरंग महाराज येवले, बी डी काळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य इंद्रजीत जाधव सर, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग शेठ एरंडे, जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार, समाजकल्याण अधिकारी अशोक सोळंके,अमेय अग्रवाल तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वच प्रमुख वक्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे व अटल बिहारी वाजपेयी विचार मंचाच्या करीत असलेल्या सामाजिक कार्याचे तोंड भरून कौतुक केले.भारतीय जनता पक्ष यांचे वतीने आंबेगाव तालुक्यात सर्व नागरिकांना आरोग्य सेवा शासनाचे विविध लाभ घरोघरी प्रत्येक नागरिकाला पोचवण्याचे काम तालुका अध्यक्ष डॉ ताराचंद कराळे करीत आहेत असे विविध मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले दिव्यांग बांधव यांना लवकरच वयोश्री योजनेचा लाभ आंबेगाव तालुक्यातील जेष्ठ नागरिक यांना आम्ही विविध ठिकाणी शिबिर आयोजित करून देणार आहे असे डॉ ताराचंद कराळे यांनी सांगितले.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती दादा भवारी, तालुका संघटन सरचिटणीस संदीप भाऊ बाणखेले, जिल्हा कायदा आघाडी सचिव स्वप्नाताई पिंगळे, तालुका सरचिटणीस गणेश काळे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष मेघश्याम भोर, जयेश काळे, बाळासाहेब कोकणे, गणेश बाणखेले, सागर घोलप, रामचंद्र कोकाटे, सूर्यकांत धादवड, माऊली भोर, समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था अध्यक्ष सुनील दरेकर,उपाध्यक्ष समीर टाव्हरे,सचिव पांडुरंग काळे,खजिनदार पूनम काळे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्षाच्या मंचर महिला मोर्चा शहराध्यक्ष जागृती ताई महाजन यांनी केले. प्रास्ताविक युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुशांत थोरात तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक आघाडी जिल्हा सचिव संजय नांगरे यांनी केले.

लोणी भापकर ग्राम स्वच्छता अभियान गुप्रच्या सदस्यांच्या मुलांनी दहावीत चांगले यश संपादन केल्याने विद्यार्थ्यांचा गुप्रच्या वतीने विशेष सन्मान

उरुळी कांचन

लोणी भापकर येथील ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपचे सदस्य विजयकुमार गोलांडे, विजय पाटोळे, प्रकाश भापकर, सचिन पवार, सचिन भापकर, सचिन कांबळे, रवींद्र आत्माराम भापकर, अविनाश गायकवाड, राजेंद्र खलाटे, विजय भापकर, जयदीप भापकर, राहुल भैय्या भापकर,दिपक गायकवाड, सचिन संभाजी भापकर, ऋषिकेश भापकर, संदीप भापकर, गणेश भापकर, शरद भापकर, राजू मदने, संदीप गावडे, गणेश भापकर, अभिजित भापकर, शेखर भोसले, योगेश भापकर, विजय यादव, संकेत भापकर, नंदकुमार मदने, अमोल मदने, मनोज वाघ, काका भापकर, हरिश्चंद्र दिक्षीत यांनी आपल्या ग्रुप च्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षांमध्ये न्यु इंग्लिश स्कुल, लोणी भापकर येथील यश संपादन केलेले.

विद्यार्थी – प्रणव भानुदास भंडलकर, राजनंदिनी प्रकाश भापकर, हर्षदा सचिन भापकर, पायल संतोष खैरे, नेहा शांताराम मोरे, सुहानी राजेंद्र मदने , भाग्यश्री मनोहर भापकर यांचा गुणगौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन ग्रुपच्या वतीने त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच पुढील काळामध्ये ग्रुपच्या वतीने कोणतीही मदत लागल्यास ती देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच यशस्वी विद्यार्थी यांच्या यशामध्ये अतिशय मोलाचा वाटा असणारे शिक्षक सुनिल वाल्मिक यादव यांचा सत्कार करण्यात आला आहे.

लोणी भापकर ग्राम स्वच्छता अभियान गुप्रच्या सदस्यांच्या मुलांनी दहावीत चांगले यश संपादन केल्याने विद्यार्थ्यांचा गुप्रच्या वतीने विशेष सन्मान

उरुळी कांचन

लोणी भापकर येथील ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपचे सदस्य विजयकुमार गोलांडे, विजय पाटोळे, प्रकाश भापकर, सचिन पवार, सचिन भापकर, सचिन कांबळे, रवींद्र आत्माराम भापकर, अविनाश गायकवाड, राजेंद्र खलाटे, विजय भापकर, जयदीप भापकर, राहुल भैय्या भापकर,दिपक गायकवाड, सचिन संभाजी भापकर, ऋषिकेश भापकर, संदीप भापकर, गणेश भापकर, शरद भापकर, राजू मदने, संदीप गावडे, गणेश भापकर, अभिजित भापकर, शेखर भोसले, योगेश भापकर, विजय यादव, संकेत भापकर, नंदकुमार मदने, अमोल मदने, मनोज वाघ, काका भापकर, हरिश्चंद्र दिक्षीत यांनी आपल्या ग्रुप च्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षांमध्ये न्यु इंग्लिश स्कुल, लोणी भापकर येथील यश संपादन केलेले.

विद्यार्थी – प्रणव भानुदास भंडलकर, राजनंदिनी प्रकाश भापकर, हर्षदा सचिन भापकर, पायल संतोष खैरे, नेहा शांताराम मोरे, सुहानी राजेंद्र मदने , भाग्यश्री मनोहर भापकर यांचा गुणगौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन ग्रुपच्या वतीने त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच पुढील काळामध्ये ग्रुपच्या वतीने कोणतीही मदत लागल्यास ती देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच यशस्वी विद्यार्थी यांच्या यशामध्ये अतिशय मोलाचा वाटा असणारे शिक्षक सुनिल वाल्मिक यादव यांचा सत्कार करण्यात आला आहे.

हार्मोनी केमिकल कंपनीमध्ये ४७ लाख ,२७ हजार रुपयांची चोरी

सुरेश बागल

कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसी मधील हार्मोनी ऑरगॅनिक्स प्रा. लि. या केमिकल कंपनीमधून केमिकल पावडरची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यामध्ये पॅलेडियम कॅटलिस्ट २६ किलो व कॅटलिस्ट १०१ नावाचे १७ किलो वजनाचे केमिकल ४७ लाख,
२७ हजार हजार २५० रुपयांचे केमिकल चोरी झालेली आहे.

सदरची पावडर ही अनेक व वेगवेगळ्या सीलबंद निळ्या रंगाच्या डब्यात ठेवलेले होते. हे केमिकल युक्त ड्रम या ठिकाणी दिसून न आल्याने हे केमिकल पावडर चोरी झाल्याचे दिसून आले. सदरचा तपास पोलीस सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे करत आहेत.

हार्मोनी ऑरगॅनिक्स केमिकल कंपनी मधून २६ जून रात्री ते २७ जून सकाळच्या दरम्यान पॅलेडियम कॅटलिस्ट नावाची केमिकल युक्त पावडर ४७ लाख २७ हजार २५० रुपयांचे केमिकल चोरी झाल्याची
फिर्याद कंपनीचे अधिकारी व स्टोर मॅनेजर दीपक चौधरी वय( ५६ ) रा.बारामती यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.कुरकुंभ एम.आय.डी.सी.तील चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढत आहे.

ड्रीम फाउंडेशन तर्फे आयुष्य घडविताना कार्यक्रमाचे आयोजन

दिनेश पवार ,दौंड

ड्रीम फाउंडेशन व चाणक्य गुरुकुल च्या वतीने मंगळवार दि.5 जुलै 2022 रोजी बालगंधर्व पुणे येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी आम्हीही घडलो,तुम्हीही घडा, आयुष्य घडविताना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध पाच प्रशिक्षक विचार व्यक्त करत आहेत, सदर कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून विद्यार्थ्यांनी नेतृत्व, कर्तृत्व, प्रभुत्व निर्माण करताना कशी योग्य वाट धरावी याचे मार्गदर्शन केले जाणार आहे,

यामध्ये काशिनाथ भतगुणकी सोलापूर यांचे यशस्वी होणारच,भूषण खैरनार नाशिक यांचे होय!तुम्ही जिंकणारच,अमोल तळेकर जालना यांचे मनाची ताकद व यशाची ऊर्जा,नंदिनी भावसार यांचे करियर ची दशा व दिशा,स्नेहल मांडवकर यांचेकरियर निवडताना योग्य समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे, या कार्यक्रमाचे संयोजक संगीता पाटील व समन्वयक दिनेश पवार हे आहेत

ओतूर ते देहू आळंदी “पर्यावरण बचाव सायकलवारी” चे नारायणगावात स्वागत

किरण वाजगे,नारायणगाव

राजसुय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ओतूर ते श्रीक्षेत्र आळंदी व श्रीक्षेत्र देहू अशा सायकलवारीचे प्रस्थान आज दिनांक ०३ रोजी पहाटे साडेपाच वाजता ओतूर येथून झाले. या सायकलवारीला राजसुय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजयकिरण डुंबरे यांनी ओतूर मधून हिरवा झेंडा दाखविला.

“सायकल चलाओ, आरोग्य बचाओ” तसेच “पर्यावरण संवर्धन व संरक्षण” अशा संदेश देणारी ही सायकलवारी त्यानंतर श्रीक्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहराचे दर्शन घेऊन नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन ही सायकल वारी घेऊन पुढे आळंदी व देहूकडे रवाना झाली. याप्रसंगी नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष सुदीप कसाबे, समाजसेविका मनीषा बांगर, हरिभाऊ जगदाळे, गणेश गाडे उपस्थित होते.

यावेळी सायकलवारीत सहभागी झालेल्या फाउंडेशनच्या संचालिका उर्मिला महाकाळ, डॉ सविता फलके, मनीषा डुंबरे, निशा ढोबळे, अनुराधा डुंबरे, पुनम महाकाळ, सुप्रिया डुंबरे, राधिका नलावडे, शिक्षिका रोहिणी वाकचौरे, दिपाली डुंबरे या दहा महिला या सायकलवारीमध्ये सहभागी झाल्या असून त्यांच्यासोबत गणेश गाडे हे केअर टेकर म्हणून सहभागी झाले आहेत. सायकलवारीत सहभागी झालेले या सर्व महिला भगिनींचा सरपंच योगेश पाटे व व्हा.चेअरमन किरण वाजगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन नारायणगावच्या प्रवेशद्वारावर सत्कार करण्यात आला. त्यानंतर ही सायकलवारी आळंदी व देहूकडे रवाना झाली.

रोटरी क्लबच्या वतीने सोरतापवाडी येथील पुरोगामी विद्यालयाला डिजिटल क्लासरूमची व्यवस्था

उरुळी कांचन

रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा एलिटच्या वतीने सोरतापवाडी येथील पुरोगामी विद्यालय यांना स्मार्ट टीव्ही म्हणजेच डिजिटल क्लासरूम ची व्यवस्था करून दिली. या ठिकाणी क्लबच्या अध्यक्षा रो रुपाली पवार, संस्थेचे सचिव रंगनाथ कड, प्रायोजक नारायण मेहेत्रे, उद्योजक प्रवीण शितोळे, संस्थेचे संचालक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

प्रायोजक नारायण मेहेत्रे यांनी ध्येयाचा ध्यास घेऊन प्रयत्न केले असता ध्येय नक्कीच साध्य होते असा संदेश दिला.

अध्यक्षा रूपाली पवार म्हणाल्या टेक्नॉलॉजीचा वापर आज अत्यावश्यक झालेला आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवावे.

संस्थेचे सचिव यांनी आभार मानले आणि विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.

नायगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा

उरुळी कांचन

महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोटे, उप विभागीय कृषी अधिकारी नरहे, तालुका कृषी अधिकारी साळे यांच्या मार्गदर्शना मध्ये नायगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा झाला. यावेळी कृषी पर्यवेक्षक रामदास डावखर शासनाच्या विविध योजना व डीबिटी पोर्टल द्वारे लाभ घेण्याची पद्धत व त्याचे विविध टप्पे समजावून सांगताना शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांचे शंका निरसन केले. कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गांडूळ खत, नाडेप खत, विहित पुनर्भरण, सलग व बांधावर फळबाग लागवड योजना बद्दल माहिती दिली. कृषी सहाय्यक महेश महाडिक यांनी बाजरी व ऊस बीजप्रक्रिया बद्दल माहिती दिली.

मा.प्र.सरपंच राजेंद्र रतन चौधरी यांनी शेतीशी निगडित बँक कर्ज संलग्न अनुदान योजना बद्दल माहिती देऊन त्यात सहभागी होऊन आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन केले. यावेळी आत्मा योजणे अंतर्गत परस बागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी बियाणे किट वाटप करण्यात आले तसेच जिवाणू कल्चर चे देखील वाटप करण्यात आले.

यावेळी प्रगतिशील शेतकरी व कृषी मित्र चंद्रकांत हिरामण चौधरी, शरद चौधरी, विकास चौधरी, सुहास चौधरी, निलेश चौधरी, समीर चौधरी, सागर चौधरी, चंद्रकांत रांनबा चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी केले.

प्रत्येक राज्यात लोकपाल कार्यालय सुरु करावीत,तसेचं लोकायुक्तांची तातडीने नेमणूक व्हावी – जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे

गणेश सातव,वाघोली

राळेगणसिद्धी येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या माध्यमातून जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम २०१३ या कायद्याच्या मराठी अनुवादित पुस्तिकेचे प्रकाशन आण्णा हजारे यांच्या हस्ते व जन आंदोलन न्यासाचे विश्वस्त,प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी आण्णांनी उपस्थित कार्यकर्त्यांना लोकपाल व लोकायुक्त कायद्याबाबत मार्गदर्शन केले.

केंद्र सरकारच्या वतीने केंद्रात लोकपालांची नियुक्ती करण्यात आली मात्र अजुनही राज्यात लोकायुक्त कायदा लागु न झाल्याने लोकायुक्तांची नियुक्ती करण्यात आली नाही.प्रत्येक राज्याच्या सरकारने आप-आपल्या राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती लवकरात लवकर करावी.

त्याचबरोबर लोकपालचे कार्यालय सध्या दिल्ली येथे आहे.जनतेच्या सोयीसाठी प्रत्येक राज्यात हि कार्यालये व्हावीत,असे आवाहन यावेळी आण्णांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला केले.

पुस्तिकेत लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम २०१३,लोकपाल निवड समिती, लोकपाल शोध समिती, लोकपाल अध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज नमुना,भारताचे पहिले लोकपाल अध्यक्ष व सदस्य,लोकसेवकांच्या भ्रष्टाचार संबधीचा तक्रार अर्जाचा नमुना अशी अतिशय उपयुक्त माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून निशुल्क उपलब्ध करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने हि माहिती सर्व सामान्यापर्यंत पोहचवणे,उपलब्ध करुन देणे हे सरकारची जबाबदारी होती.ती माहिती उपलब्ध केली परंतु,सरकारने इंग्रजी भाषेत असणाऱ्या २५ पानांच्या कायद्याच्या पुस्तिकेची विक्री किमंत ६२५/- रुपये ठेवली त्यानंतर पुढे दुरुस्ती बदल करून दिड पानांच्या लेखाची किमंत १६९/- रुपये ठेवली.यामागे सर्वसामान्य नागरिकांना परवडू नये,त्यांच्या पर्यंत हि माहिती पोहचू नये असा सरकारचा हेतू होता अशी टिका हि यावेळी प्रमुख उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.

राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती न होणे,नागरिकांची सनद कायदा आस्तित्वात न आल्याने,जनतेला जलद न्याय मिळवण्यासाठी न्यायीक मानके व उत्तरदायित्व विधेयक याबाबत तत्कालीन केंद्र सरकार व लोकपाल मसुदा समीती यांच्यामध्ये चर्चा होऊन हि अद्याप विषय प्रलंबित असल्यामुळे वरील बाबींच्या पूर्ततेसाठी येणाऱ्या पुढील काळात पुन्हा एकदा जन आंदो उभारावे लागणार आहे असे हि यावेळी आण्णांनी नमूद केले.

अद्यापही जनतेला खरे स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी हि दुसरी लढाई आहे.असे समजून इच्छा असलेल्या कार्याकर्त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या कार्यात सहभागी व्हावे,असे आवाहन कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आण्णा हजारे यांनी केले.

या पुस्तिका प्रकाशन सोहळ्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे विश्वस्त अँड अजित देशमुख,राऊत सर,संदीप जगताप(सातारा),डॉ.लक्ष्मण जाधव(परभणी),शिवशंकर गायकवाड(जालना),अविनाश पसारकर(वाशीम)शेख हनिफ(लातूर),समन्वयक शिवाजीराव खेडकर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

“एकच ध्यास, झाडे लावा झाडे जगवा : पिंपळे जगताप येथील धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पात ५०० देशी वृक्षांची लागवड

गणेश सातव,वाघोली

माहिती सेवा समिती, पिंपळे जगताप ग्रामस्थ व इतर सहयोगी संस्था, वृक्ष मित्र, शिरूर हवेली तालुक्यातील अनेक संस्थांवर काम करणारे दानशूर व्यक्ती, उद्योजक या सर्वांचे सहकार्याने तसेच पिंपळे जगताप गावचे सुपुत्र माहिती सेवा वृक्षसंवर्धन समितीचे शिरूर तालुका अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांच्या माध्यमातून २ आक्टोंबर पासून वृक्षारोपण सुरू आहे. आज अखेर देवराईत ११००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

पिंपळे जगताप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व महाराज सयाजीराव गायकवाड विद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नुकतेचं ५०० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी मोठ्याप्रमाणात ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.वृक्षारोपणाबाबत जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावातून वनराई प्रकल्पापर्यंत वृक्ष दिंडी काढण्यात आली होती. त्याचे स्वागत ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आले. माहिती सेवा वृक्षसंवर्धन समिती व ग्रामस्थ पिंपळे जगताप यांचे माध्यमातून अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.
माहिती सेवा समितीचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपल्यानंतर वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी,ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला.
दि.३ जुलै २०२२ रोजी सुध्दा १५०० देशी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्व ग्रामस्थांनी, वृक्षप्रेमींनी आपला सहभाग नोंदवून उपस्थित राहावे असे आवाहन शिरुर तालुका वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी केले आहे.