हार्मोनी केमिकल कंपनीमध्ये ४७ लाख ,२७ हजार रुपयांची चोरी

सुरेश बागल

कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसी मधील हार्मोनी ऑरगॅनिक्स प्रा. लि. या केमिकल कंपनीमधून केमिकल पावडरची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यामध्ये पॅलेडियम कॅटलिस्ट २६ किलो व कॅटलिस्ट १०१ नावाचे १७ किलो वजनाचे केमिकल ४७ लाख,
२७ हजार हजार २५० रुपयांचे केमिकल चोरी झालेली आहे.

सदरची पावडर ही अनेक व वेगवेगळ्या सीलबंद निळ्या रंगाच्या डब्यात ठेवलेले होते. हे केमिकल युक्त ड्रम या ठिकाणी दिसून न आल्याने हे केमिकल पावडर चोरी झाल्याचे दिसून आले. सदरचा तपास पोलीस सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे करत आहेत.

हार्मोनी ऑरगॅनिक्स केमिकल कंपनी मधून २६ जून रात्री ते २७ जून सकाळच्या दरम्यान पॅलेडियम कॅटलिस्ट नावाची केमिकल युक्त पावडर ४७ लाख २७ हजार २५० रुपयांचे केमिकल चोरी झाल्याची
फिर्याद कंपनीचे अधिकारी व स्टोर मॅनेजर दीपक चौधरी वय( ५६ ) रा.बारामती यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.कुरकुंभ एम.आय.डी.सी.तील चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढत आहे.

Previous articleड्रीम फाउंडेशन तर्फे आयुष्य घडविताना कार्यक्रमाचे आयोजन
Next articleलोणी भापकर ग्राम स्वच्छता अभियान गुप्रच्या सदस्यांच्या मुलांनी दहावीत चांगले यश संपादन केल्याने विद्यार्थ्यांचा गुप्रच्या वतीने विशेष सन्मान