ड्रीम फाउंडेशन तर्फे आयुष्य घडविताना कार्यक्रमाचे आयोजन

दिनेश पवार ,दौंड

ड्रीम फाउंडेशन व चाणक्य गुरुकुल च्या वतीने मंगळवार दि.5 जुलै 2022 रोजी बालगंधर्व पुणे येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी आम्हीही घडलो,तुम्हीही घडा, आयुष्य घडविताना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध पाच प्रशिक्षक विचार व्यक्त करत आहेत, सदर कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून विद्यार्थ्यांनी नेतृत्व, कर्तृत्व, प्रभुत्व निर्माण करताना कशी योग्य वाट धरावी याचे मार्गदर्शन केले जाणार आहे,

यामध्ये काशिनाथ भतगुणकी सोलापूर यांचे यशस्वी होणारच,भूषण खैरनार नाशिक यांचे होय!तुम्ही जिंकणारच,अमोल तळेकर जालना यांचे मनाची ताकद व यशाची ऊर्जा,नंदिनी भावसार यांचे करियर ची दशा व दिशा,स्नेहल मांडवकर यांचेकरियर निवडताना योग्य समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे, या कार्यक्रमाचे संयोजक संगीता पाटील व समन्वयक दिनेश पवार हे आहेत

Previous articleओतूर ते देहू आळंदी “पर्यावरण बचाव सायकलवारी” चे नारायणगावात स्वागत
Next articleहार्मोनी केमिकल कंपनीमध्ये ४७ लाख ,२७ हजार रुपयांची चोरी