प्रत्येक राज्यात लोकपाल कार्यालय सुरु करावीत,तसेचं लोकायुक्तांची तातडीने नेमणूक व्हावी – जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे

गणेश सातव,वाघोली

राळेगणसिद्धी येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या माध्यमातून जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम २०१३ या कायद्याच्या मराठी अनुवादित पुस्तिकेचे प्रकाशन आण्णा हजारे यांच्या हस्ते व जन आंदोलन न्यासाचे विश्वस्त,प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी आण्णांनी उपस्थित कार्यकर्त्यांना लोकपाल व लोकायुक्त कायद्याबाबत मार्गदर्शन केले.

केंद्र सरकारच्या वतीने केंद्रात लोकपालांची नियुक्ती करण्यात आली मात्र अजुनही राज्यात लोकायुक्त कायदा लागु न झाल्याने लोकायुक्तांची नियुक्ती करण्यात आली नाही.प्रत्येक राज्याच्या सरकारने आप-आपल्या राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती लवकरात लवकर करावी.

त्याचबरोबर लोकपालचे कार्यालय सध्या दिल्ली येथे आहे.जनतेच्या सोयीसाठी प्रत्येक राज्यात हि कार्यालये व्हावीत,असे आवाहन यावेळी आण्णांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला केले.

पुस्तिकेत लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम २०१३,लोकपाल निवड समिती, लोकपाल शोध समिती, लोकपाल अध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज नमुना,भारताचे पहिले लोकपाल अध्यक्ष व सदस्य,लोकसेवकांच्या भ्रष्टाचार संबधीचा तक्रार अर्जाचा नमुना अशी अतिशय उपयुक्त माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून निशुल्क उपलब्ध करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने हि माहिती सर्व सामान्यापर्यंत पोहचवणे,उपलब्ध करुन देणे हे सरकारची जबाबदारी होती.ती माहिती उपलब्ध केली परंतु,सरकारने इंग्रजी भाषेत असणाऱ्या २५ पानांच्या कायद्याच्या पुस्तिकेची विक्री किमंत ६२५/- रुपये ठेवली त्यानंतर पुढे दुरुस्ती बदल करून दिड पानांच्या लेखाची किमंत १६९/- रुपये ठेवली.यामागे सर्वसामान्य नागरिकांना परवडू नये,त्यांच्या पर्यंत हि माहिती पोहचू नये असा सरकारचा हेतू होता अशी टिका हि यावेळी प्रमुख उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.

राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती न होणे,नागरिकांची सनद कायदा आस्तित्वात न आल्याने,जनतेला जलद न्याय मिळवण्यासाठी न्यायीक मानके व उत्तरदायित्व विधेयक याबाबत तत्कालीन केंद्र सरकार व लोकपाल मसुदा समीती यांच्यामध्ये चर्चा होऊन हि अद्याप विषय प्रलंबित असल्यामुळे वरील बाबींच्या पूर्ततेसाठी येणाऱ्या पुढील काळात पुन्हा एकदा जन आंदो उभारावे लागणार आहे असे हि यावेळी आण्णांनी नमूद केले.

अद्यापही जनतेला खरे स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी हि दुसरी लढाई आहे.असे समजून इच्छा असलेल्या कार्याकर्त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या कार्यात सहभागी व्हावे,असे आवाहन कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आण्णा हजारे यांनी केले.

या पुस्तिका प्रकाशन सोहळ्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे विश्वस्त अँड अजित देशमुख,राऊत सर,संदीप जगताप(सातारा),डॉ.लक्ष्मण जाधव(परभणी),शिवशंकर गायकवाड(जालना),अविनाश पसारकर(वाशीम)शेख हनिफ(लातूर),समन्वयक शिवाजीराव खेडकर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous article“एकच ध्यास, झाडे लावा झाडे जगवा : पिंपळे जगताप येथील धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पात ५०० देशी वृक्षांची लागवड
Next articleनायगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा