“एकच ध्यास, झाडे लावा झाडे जगवा : पिंपळे जगताप येथील धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पात ५०० देशी वृक्षांची लागवड

गणेश सातव,वाघोली

माहिती सेवा समिती, पिंपळे जगताप ग्रामस्थ व इतर सहयोगी संस्था, वृक्ष मित्र, शिरूर हवेली तालुक्यातील अनेक संस्थांवर काम करणारे दानशूर व्यक्ती, उद्योजक या सर्वांचे सहकार्याने तसेच पिंपळे जगताप गावचे सुपुत्र माहिती सेवा वृक्षसंवर्धन समितीचे शिरूर तालुका अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांच्या माध्यमातून २ आक्टोंबर पासून वृक्षारोपण सुरू आहे. आज अखेर देवराईत ११००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

पिंपळे जगताप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व महाराज सयाजीराव गायकवाड विद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नुकतेचं ५०० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी मोठ्याप्रमाणात ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.वृक्षारोपणाबाबत जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावातून वनराई प्रकल्पापर्यंत वृक्ष दिंडी काढण्यात आली होती. त्याचे स्वागत ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आले. माहिती सेवा वृक्षसंवर्धन समिती व ग्रामस्थ पिंपळे जगताप यांचे माध्यमातून अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.
माहिती सेवा समितीचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपल्यानंतर वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी,ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला.
दि.३ जुलै २०२२ रोजी सुध्दा १५०० देशी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्व ग्रामस्थांनी, वृक्षप्रेमींनी आपला सहभाग नोंदवून उपस्थित राहावे असे आवाहन शिरुर तालुका वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी केले आहे.

Previous articleकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संवाद कौशल्य आवश्यक- राजेंद्र कोंढरे
Next articleप्रत्येक राज्यात लोकपाल कार्यालय सुरु करावीत,तसेचं लोकायुक्तांची तातडीने नेमणूक व्हावी – जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे