भाजपाकडून दिव्यांगांना व्हिलचेअर, श्रवण यंत्रे व कृत्रिम फूटचे वाटप

घोडेगाव : –
अटल बिहारी वाजपेयी विचारमंच पुणे जिल्हा, समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था आणि भारतीय जनता पक्ष आंबेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी घोडेगाव येथील अमित पॅलेस येथे साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्हा पुनर्वसन केंद्र औंध हॉस्पिटल यांचे मार्फत दिव्यांग बांधवांना 40 व्हील चेअर, 20श्रवण यंत्रे व कृत्रिम पायाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी ह.भ.प पांडुरंग महाराज येवले, बी डी काळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य इंद्रजीत जाधव सर, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग शेठ एरंडे, जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार, समाजकल्याण अधिकारी अशोक सोळंके,अमेय अग्रवाल तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वच प्रमुख वक्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे व अटल बिहारी वाजपेयी विचार मंचाच्या करीत असलेल्या सामाजिक कार्याचे तोंड भरून कौतुक केले.भारतीय जनता पक्ष यांचे वतीने आंबेगाव तालुक्यात सर्व नागरिकांना आरोग्य सेवा शासनाचे विविध लाभ घरोघरी प्रत्येक नागरिकाला पोचवण्याचे काम तालुका अध्यक्ष डॉ ताराचंद कराळे करीत आहेत असे विविध मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले दिव्यांग बांधव यांना लवकरच वयोश्री योजनेचा लाभ आंबेगाव तालुक्यातील जेष्ठ नागरिक यांना आम्ही विविध ठिकाणी शिबिर आयोजित करून देणार आहे असे डॉ ताराचंद कराळे यांनी सांगितले.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती दादा भवारी, तालुका संघटन सरचिटणीस संदीप भाऊ बाणखेले, जिल्हा कायदा आघाडी सचिव स्वप्नाताई पिंगळे, तालुका सरचिटणीस गणेश काळे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष मेघश्याम भोर, जयेश काळे, बाळासाहेब कोकणे, गणेश बाणखेले, सागर घोलप, रामचंद्र कोकाटे, सूर्यकांत धादवड, माऊली भोर, समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था अध्यक्ष सुनील दरेकर,उपाध्यक्ष समीर टाव्हरे,सचिव पांडुरंग काळे,खजिनदार पूनम काळे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्षाच्या मंचर महिला मोर्चा शहराध्यक्ष जागृती ताई महाजन यांनी केले. प्रास्ताविक युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुशांत थोरात तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक आघाडी जिल्हा सचिव संजय नांगरे यांनी केले.

Previous articleलोणी भापकर ग्राम स्वच्छता अभियान गुप्रच्या सदस्यांच्या मुलांनी दहावीत चांगले यश संपादन केल्याने विद्यार्थ्यांचा गुप्रच्या वतीने विशेष सन्मान
Next articleकनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप