कनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

राजगुरूनगर- कनेरसर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव बळवंतराव कानडे (दादा)यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेरसर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी कनेरसर केंद्राचे प्रेरणादायी केंद्रप्रमुख आदरणीय श्री.बाळासाहेब गावडे (साहेब), पत्रकार बाळासाहेब सांडभोर ( साहेब), विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मा.श्री. मच्छिंद्र दौंडकर, व्हाईस चेअरमन श्री.काळूराम लोखंडे,तसेच संचालक श्री.नरेंद्र दौंडकर, नंदू कानडे, श्री.काळूराम दौंडकर, विशाल माशेरे,शाळेचे मुख्याध्यापक श्री. नानाभाऊ गावडे, सामाजिक कार्यकर्ते,कार्यक्रमाचे आयोजक श्री.अतुलभाऊ कानडे (साहेब) शाळेतील शिक्षिका श्रीम.अंजली शितोळे मॅडम, श्रीम.सारिका राक्षे मॅडम, श्रीम.शुभांगी जाधव मॅडम ,पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.संदिप म्हसुडगे सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे सर यांनी केले.

मान्यवरांचा सन्मान शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कु.अर्णव राहूल गायकवाड,विद्यार्थीनी देवीका प्रदिप म्हसुडगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केला.

कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले असता इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कु.अर्णव राहूल गायकवाड याने खुप छान उत्तरे दिली त्यास मा.केंद्रप्रमुख मा.श्री.बाळासाहेब गावडे साहेब यांच्या वतीने १०० रूपये बक्षिस देवून शाळ, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम.अंजली शितोळे मॅडम, श्रीम.शुभांगी जाधव मॅडम यांनी केले. तर आभार शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सारिका मॅडम यांनी मानले.

Previous articleभाजपाकडून दिव्यांगांना व्हिलचेअर, श्रवण यंत्रे व कृत्रिम फूटचे वाटप
Next article२०,२१ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार- एस.एम देशमुख