रोटरी क्लबच्या वतीने सोरतापवाडी येथील पुरोगामी विद्यालयाला डिजिटल क्लासरूमची व्यवस्था

उरुळी कांचन

रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा एलिटच्या वतीने सोरतापवाडी येथील पुरोगामी विद्यालय यांना स्मार्ट टीव्ही म्हणजेच डिजिटल क्लासरूम ची व्यवस्था करून दिली. या ठिकाणी क्लबच्या अध्यक्षा रो रुपाली पवार, संस्थेचे सचिव रंगनाथ कड, प्रायोजक नारायण मेहेत्रे, उद्योजक प्रवीण शितोळे, संस्थेचे संचालक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

प्रायोजक नारायण मेहेत्रे यांनी ध्येयाचा ध्यास घेऊन प्रयत्न केले असता ध्येय नक्कीच साध्य होते असा संदेश दिला.

अध्यक्षा रूपाली पवार म्हणाल्या टेक्नॉलॉजीचा वापर आज अत्यावश्यक झालेला आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवावे.

संस्थेचे सचिव यांनी आभार मानले आणि विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.

Previous articleनायगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा
Next articleओतूर ते देहू आळंदी “पर्यावरण बचाव सायकलवारी” चे नारायणगावात स्वागत