Home Blog Page 101

कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संवाद कौशल्य आवश्यक- राजेंद्र कोंढरे

दिनेश पवार – दौंड

वेगवान स्पर्धेच्या युगात कर्तृत्व सिध्द करण्यासाठी वाचन,चिंतन,संवाद कौशल्य युवकांनी आत्मसात करावे असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी नीरा जि. पुणे येथे आयोजित जाहीर सत्कार व सन्मान सोहळ्यात व्यक्त केले,राजेंद्र कोंढरे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नीरा येथे जाहीर सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जेष्ठ साहित्यीक बोधे सर,पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड,ढमाळ यांचा सत्कार करण्यात आला,पुणे शहर अध्यक्ष गुलाबदादा गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप,महिला जिल्हा अध्यक्ष प्रियांका काटे यांनी मनोगत व्यक्त केले.


यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नाना जगताप,शिक्षक आघाडी जिल्हा अध्यक्ष आदिनाथ थोरात,पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम बाबा पवार, दौंड तालुका अध्यक्ष दादासाहेब नांदखिले,उमेश वीर,प्रसाद गायकवाड,विनायक सुंबे,युवक अध्यक्ष विकास जगदाळे,शहर अध्यक्ष शैलेश पवार,रोहन घोरपडे,संदीप जगताप,किसन काळे,रोहिदास काळे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी केले तर आभार पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जेधे यांनी मानले.

बार मध्ये घुसून मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील “कोयता गॅंग” च्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

नारायणगाव , किरण वाजगे

घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस स्टेशन हद्दीमधील डिंभे येथील एका बियर बारवर मागील वर्षी दरोडा टाकून दहशत वाजवणाऱ्या कोयता गँगच्या म्होरक्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

बाप्पू तुकाराम जाधव (रा. डिंभे ता. आंबेगाव जि. पुणे ) यांनी दि.२१/३/२०२१ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार संध्याकाळी पाच वाजता हॉटेल सागर बार,डिंभे खुर्द येथे बाबू गेंगजे व गोट्या उर्फ गफऱ्या उर्फ अशोक मदगे तसेच त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांनी बार मध्ये घुसून उधार दारू दे नाहीतर पैसे दे असे म्हणून हॉटेल च्या काउंटर मधील पैसे काढून घेऊन हॉटेल मध्ये तोडफोड केली व हॉटेल मध्ये पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयन्त केला अशा आशयाची फिर्याद दिली होती.

या गुन्ह्यातील आरोपी बाबू गेंगजे व अशोक मदगे हे डिंभे परिसरात कोयता गॅंग नावाची गॅंग चालवत होते व दहशत पसरवत होते. हा गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी हे फरार झाले होते. त्यांना शोधून लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पो. हवालदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, संबंधित गुन्ह्यातील आरोपी अशोक मदगे हा कोरेगाव भीमा येथे पेंटींग चे काम करत असून तो कोरेगाव भीमा येथील चौकात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक मदगे यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवून नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक उर्फ गोट्या उर्फ गफऱ्या रखमा मदगे (रा. गोहे बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे सांगितले. त्याच्याकडे डिंभे येथील बारमध्ये केलेल्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी घोडेगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

दरम्यान या आरोपीवर यापूर्वी २०१७ मध्ये घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके
पो.उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पो. हवालदार दिपक साबळे राजू मोमीन, विक्रम तापकीरपो. कर्मचारी संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर पोलीस मित्र
प्रसाद पिंगळे यांनी केली आहे.

भाजपने राज्यात सत्ता स्थापन केल्याने पुर्व हवेलीत आनंदोत्सवाचे आयोजन – तालुका अध्यक्ष भाजप संदिप भोंडवे

उरुळी कांचन

भाजपा ने राज्यात सत्ता स्थापन केल्याने पुर्व हवेलीमधील कार्यकर्त्यांना अत्यानंद झाला असुन तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी व पुर्व हवेलीमधील नागरिकांना आनंदोत्सवामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद , प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहीदास उंद्रे व धर्मेंद्र खांडरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ३ जूलै रोजी तुळापुर – पेरणे – न्हावी – सांगवी – अष्टापुर फाटा – वाडेबोल्हाई – केसंदन – वाघोली – केसनंद – थेऊर – कदमवाक वस्ती – लोणीकाळभोर – कुंजीरवाडी व उरुळी कांचन अशी चारचाकी गाड्यांची रॅली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले. पुर्व हवेली मधील सर्व भाजपा नेते , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या चारचाकी गाड्यांच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम पत्रिका सकाळी तुळापुर ९.३० ते १.०० – रॅली प्रवास असा दिनक्रम असेल. या वेळी सुनिल पाटील कांचन, शामराव गावडे, विकास जगताप, सुदर्शन चौधरी, अमित कांचन, शिवाजी महाडिक, आबासाहेब चव्हाण, सुनिल तुपे, अतुल मोरे, शुभम वलटे, सोहम जगताप, पुजा सणस आदी उपस्थित होते.

भंडारी कुटूंबाकडून अष्टापूर येथील अंगणवाड्यांना साहित्याची मदत

उरुळी कांचन

अष्टापुर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मल्लिकार्जुन भंडारी, जयश्री भंडारी यांच्या हस्ते व त्यांचे चिरंजीव राकेश मल्लिकार्जुन भंडारी यांच्या वतीने अष्टापुर गावाच्या विकासासाठी स्वतःचा काहीतरी हातभार लावावा म्हणून आष्टापूरचे सरपंच कविता योगेश जगताप, उपसरपंच सुभाष कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, सदस्य अश्विनी कोतवाल, अष्टापूर ग्रामस्थ गणेश सुभाष कोतवाल, महेश ढवळे यांच्याकडे रोख स्वरुपात २५ हजार रुपये देणगी दिली.

या देणगी मधून अष्टापुर गावांमधील चारही अंगणवाड्या करता लागणारे साहित्याचे वाटप अष्टापूरच्या सरपंच कविता जगताप, योगेश जगताप उपसरपंच सुभाष कोतवाल, माजी सरपंच रमेश कारभारी कोतवाल, अष्टापूरचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य, देणगीदार, अश्विनी कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते गणेश सुभाष कोतवाल, महेश ढवळे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या व देणगीदार मल्लिकार्जुन भंडारी, जयश्री भंडारी यांचे चिरंजीव महेश भंडारी व मधुबाला भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.

सबनीस विद्यालयात मनस्वास्थ्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

नारायणगाव : (किरण वाजगे)

ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस
विद्यामंदिरामध्ये इंडियन सायकीयाट्रिक सोसायटी, वेस्टर्न झोनल ब्रांच यांच्यावतीने “गाव तिथे मानसोपचार” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मनस्वास्थ्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. प्रणवजीत काळदाते, मिलिंद कारंजकर, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सातपुते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी विद्यामंदिराचे पर्यवेक्षक रामचंद्र शेगर, सतीश तंवर सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य संवर्धनासाठी व्यायाम व मैदानी खेळ, सकस आहार, झोपेचे महत्त्व, सकारात्मक विचार, वेळेचे नियोजन, व्यसनांपासून दूर राहणे, छंद जोपासना इत्यादी विषयांवर डॉ. प्रणवजीत काळदाते यांनी मार्गदर्शन केले. तसेच किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य, ताण-तणावाचे नियोजन, अभ्यास व परीक्षांचे नियोजन, मैत्री संगत व परिणाम इत्यादी विषयांवर मिलिंद कारंजकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय,पुणे यांनी प्रकाशित केलेल्या शालेय मानसिक आरोग्य पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाप्रमुख भिमराव पालवे यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक सतीश तंवर यांनी केले व आभार पर्यवेक्षक रामचंद्र शेगर यांनी मानले.

केसनंद येथे एकाच दिवशी ९ अनाधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा

विशेष प्रतिनिधी

पुर्व हवेलीतील मौजे केसनंद गावच्या हद्दीतील गट नंबर १०१ व १०२ येथील मंगलमूर्ती वास्तु प्रा.लि यांच्या ‘जोगेश्वरी सनसिटी’ या प्लॉटिंगमधील अनाधिकृत बांधकामावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत कारवाई करण्यात आली.वाणिज्य स्वरूपाची चार, तसेच सध्या चालू असणारी पाच अनाधिकृत बांधकामे असे एकूण सुमारे १०४५० स्क्वेअर फुटाची बांधकामे निष्कासित करण्यात आली.

PMRDA च्यावतीने अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती.सदर निष्कासन कारवाई पाच पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली.यावेळी अतिक्रमण विभागाच्यावतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करून पिकांचे उत्पादन घ्यावे – पुनम सरकाळे-दुधाडे

उरुळी कांचन

आळंदी म्हातोबाची येथे कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत प्रगतशील शेतकरी संवाद दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपसंचालक निविष्ठा व गुणनियंत्रण कृषि आयुक्तालय पुणे पुनम सरकाळे-दुधाडे यांनी खतांचा संतुलित वापर,पिकांना खते देण्याची पद्धत, खतांची मात्रा विभागुन देणे बाबतचे आवाहन त्यांनी केले.

हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी शेतकरी संवाद दिन कार्यक्रमात सहभाग नोंदवुन शेतकऱ्यांनी कांदाचाळ, कृषि यांत्रिकीकरण योजना,सुक्ष्म सिंचन योजना, सेंद्रिय शेती प्रकल्प, खपली गहू उत्पादन, बाजरी प्रकल्प, सेंद्रिय भाजीपाला परसबाग मिनीकीट प्रात्य क्षिके, मधुमक्षीका पालन, कांदा बिजोत्पादन कार्यक्रम व इतर कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मंडळ कृषि अधिकारी हडपसर गुलाबराव कडलग यांनी कृषि विभागाच्या विविध योजना,एकरी १०० टन ऊस उत्पादन, सेंद्रिय शेती, ऊस पाचट व्यवस्थापन, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चरचा वापर व उत्पादन, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड गांडुळ खत प्रकल्प नाडेप खत प्रकल्प नाडेप खत प्रकल्प, विहीर पुनर्भरण कार्यक्रम बाबत मार्गदर्शन केले.

कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ मेघराज वाळुंजकर यांनी एकात्मिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती काळाची गरज, सेंद्रिय शेती शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चरचा वापर व उत्पादन, खपली गहु पिक प्रात्यक्षिके, जिवाणू कल्चरच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रगतशील शेतकरी संवाद दिन कार्यक्रमात सहभागी झालेले लोणी काळभोर येथील विनोद शेंडगे, उत्तम दुंडे व आळंदी म्हातोबाची येथील विजय जवळकर, लक्ष्मण खटाटे, ज्ञानेश्वर जवळकर, यांनी नैसर्गिक शेती पद्धती, खपली गहु उत्पादन, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चर, भेंडी व कांदा बिजोत्पादन, सेंद्रिय भाजीपाला उत्पादन व विक्री व्यवस्थापन बाबत सविस्तर चर्चा केली.सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी सिध्देश्वर अवचर, कृषि सेवक आळंदी म्हातोबाची व नागेश म्हेत्रे, कृषि सहाय्यक, तरडे यांनी यशस्वीपणे केले.

सदर कार्यक्रमास माजी सरपंच परशुराम जवळकर, शिवाजी खंडेराव जवळकर, ज्ञानेश्वर जवळकर,विजय जवळकर, केदार तिखे, दिपक झेंडे, लक्ष्मण खटाटे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाभुळवाडी (साल) येथे कृषी संजीवनी कार्यक्रम संपन्न

 घोडेगाव – तालुकास्तरीय कृषी संजीवनी मोहीम 2022 -23 तालुका कृषी अधिकारी आंबेगाव टी के चौधरी व मंडल कृषी अधिकारी घोडेगाव प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे बाभुळवाडी (साल) येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित शेतकऱ्यांना 10% टक्के खत बचत, हिरवळीच्या खताचा वापर सोयाबीन व भात पिकावरील कीड व रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव चे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी चौधरी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महिलांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन केले व कृषी विभागाच्या विविध योजनेबद्दल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे मंडळ कृषी अधिकारी प्रवीण मुंडे यांनी महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या योजनांबद्दल सौ.अनिता सुरेश निघोट यांनी मार्गदर्शन केले.

तसेच आत्मा अंतर्गत पोषण युक्त सुरक्षित अन्न योजना 2022- 23 अंतर्गत परसबाग भाजीपाला बियाणे मिनी किटचे वाटप करून घरच्या परसबागेत सेंद्रिय पद्धतीने बियाण्याचे लागवड करून स्वतःसाठी विषमुक्त भाजीपाला तयार करण्याचे सुचविले.सदर कार्यक्रमास सालगावच्या उपसरपंच श्रीमती प्रमिला गव्हाणे ,पोलीस पाटील श्रीमती वसुधा गव्हाणे त्याचप्रमाणे घोडेगाव मंडळातील सर्व कर्मचारी उपस्थित होते

आर्ट ऑफ लिविंग व शाश्वत विकास फाउंडेशन यांच्या मार्फत माजी सभापती प्रकाश जगताप व जेष्ठ नेते माधव काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड

उरुळी कांचन

शिंदेवाडी (ता. हवेली) येथे आर्ट ऑफ लिविंग व शाश्वत विकास फाउंडेशन यांच्या संयुक्तने बहुपयोगी लक्ष्मितरु झाडाचे वृक्षलागवड करण्यात आलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन माधव काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेवाडी येथे सव्वा दोनशे झाडे लक्ष्मीतरु लागवड करण्यात आले तसेच शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांना लागवड गावांमध्ये लावून सर्व ची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तसेच गायरान जागा शेती वने तसेच इतरठिकाणी वृक्षलागवड करीत आहे.

महाराष्ट्र मध्ये सुरेश जी पलुस्कर आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक यांनी गेले २२ वर्ष या लक्ष्मीतरुचे महत्त्वपूर्ण अभ्यास करुन त्यामध्ये नावीन्यपूर्ण काम केलं आहे आणि त्याचा उपयोग आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष होत आहे. खाद्य तेलामध्ये गाव स्वयंपूर्ण करणे आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण कॅन्सर मुक्त भारत स्वयंपूर्ण शेती स्वयंपूर्ण शेतकरी अशा विविध माध्यमातून या लागवडीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून तसेच शाश्वत विकास फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे मोठ्या कार्यक्रमात घेतला आहे. येत्या २०२२ मध्ये एक लाख लाख वृक्ष लागवड वृक्ष हाती घेतले आहे तसेच शिंदेवाडी, पिंपळेगाव, भवरापूर, नायगाव- पेठ, प्रयागधाम, हिंगणगाव, आळंदी म्हातोबा अशी ८० गावे खाद्य तेलामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग तर्फे फार मोठा काम चालू आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळी भागात वृक्ष लागवड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत कोणाचाही वाढदिवस असो त्यांची माहिती आम्ही लक्ष्मितरू वृक्षलागवड करून जनजागृतीचे काम करत आहोत.

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थनार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांचे नेतृत्वात बाईक रॅली

योगेश राऊत ,पाटस

केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा केलेला डाव उधळून लावण्यासाठी सत्तापिपासू भाजपा व शिवसेनेतील बंडखोर गद्दारां विरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थनार्थ मंगळवार दि.२८ रोजी स. १० वा. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथून दौंड तालुक्यातील वाखारी, केडगाव, चौफुला, वरवंड ,पाटस या गावामधून मार्गक्रमण करित दौंड शहरापर्यंत हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली.

यावेळी शिवसैनिकांनी हातात भगवे झेंडे फडकावून तालुक्यातील चौका चौकामधून निष्ठेला साथ..! गद्दारीला लाथ..! पाठीवर आमच्या बाळासाहेबांचा हात..! जागवले मावळे..! पेटवला वनवा..! गद्दारांना नमवून फडकवणार भगवा..! जय भवानी जय शिवाजी ! मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो ! हम तुम्हारे साथ है … शिवसेना अंगार है…बाकी सब भंगार है… या घोषणा देऊन दौंड तालुक्यातील परिसर दणाणून सोडला.

रॅलीमधील दरम्यान वरवंड व पाटस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व दौंड शहरातून रॅली काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल तात्या सोनवणे, शरद सुर्यवंशी,दौंड शहर प्रमुख आनंद पळसे यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी सहभागी पदाधिकारी व शिवसैनिकांनी …आम्ही कोणाचे समर्थक नाही …तर शिवसैनिक आहोत.‌‌..केलाच जयघोष तर आम्ही शिवसेनेचा जयघोष करू. गुवाहाटी मध्ये जाऊन पक्षाशी गद्दारी केलेल्या बंडखोरांच्या समर्थकांची निष्ठा त्यांच्या नेत्यांबरोबर विकली आहे. आम्ही शिवसैनिक नेहमी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत राहू असा विश्वास यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.