आर्ट ऑफ लिविंग व शाश्वत विकास फाउंडेशन यांच्या मार्फत माजी सभापती प्रकाश जगताप व जेष्ठ नेते माधव काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड

उरुळी कांचन

शिंदेवाडी (ता. हवेली) येथे आर्ट ऑफ लिविंग व शाश्वत विकास फाउंडेशन यांच्या संयुक्तने बहुपयोगी लक्ष्मितरु झाडाचे वृक्षलागवड करण्यात आलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन माधव काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेवाडी येथे सव्वा दोनशे झाडे लक्ष्मीतरु लागवड करण्यात आले तसेच शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांना लागवड गावांमध्ये लावून सर्व ची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तसेच गायरान जागा शेती वने तसेच इतरठिकाणी वृक्षलागवड करीत आहे.

महाराष्ट्र मध्ये सुरेश जी पलुस्कर आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक यांनी गेले २२ वर्ष या लक्ष्मीतरुचे महत्त्वपूर्ण अभ्यास करुन त्यामध्ये नावीन्यपूर्ण काम केलं आहे आणि त्याचा उपयोग आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष होत आहे. खाद्य तेलामध्ये गाव स्वयंपूर्ण करणे आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण कॅन्सर मुक्त भारत स्वयंपूर्ण शेती स्वयंपूर्ण शेतकरी अशा विविध माध्यमातून या लागवडीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून तसेच शाश्वत विकास फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे मोठ्या कार्यक्रमात घेतला आहे. येत्या २०२२ मध्ये एक लाख लाख वृक्ष लागवड वृक्ष हाती घेतले आहे तसेच शिंदेवाडी, पिंपळेगाव, भवरापूर, नायगाव- पेठ, प्रयागधाम, हिंगणगाव, आळंदी म्हातोबा अशी ८० गावे खाद्य तेलामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग तर्फे फार मोठा काम चालू आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळी भागात वृक्ष लागवड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत कोणाचाही वाढदिवस असो त्यांची माहिती आम्ही लक्ष्मितरू वृक्षलागवड करून जनजागृतीचे काम करत आहोत.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थनार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांचे नेतृत्वात बाईक रॅली
Next articleबाभुळवाडी (साल) येथे कृषी संजीवनी कार्यक्रम संपन्न