बाभुळवाडी (साल) येथे कृषी संजीवनी कार्यक्रम संपन्न

 घोडेगाव – तालुकास्तरीय कृषी संजीवनी मोहीम 2022 -23 तालुका कृषी अधिकारी आंबेगाव टी के चौधरी व मंडल कृषी अधिकारी घोडेगाव प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे बाभुळवाडी (साल) येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित शेतकऱ्यांना 10% टक्के खत बचत, हिरवळीच्या खताचा वापर सोयाबीन व भात पिकावरील कीड व रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव चे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी चौधरी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महिलांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन केले व कृषी विभागाच्या विविध योजनेबद्दल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे मंडळ कृषी अधिकारी प्रवीण मुंडे यांनी महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या योजनांबद्दल सौ.अनिता सुरेश निघोट यांनी मार्गदर्शन केले.

तसेच आत्मा अंतर्गत पोषण युक्त सुरक्षित अन्न योजना 2022- 23 अंतर्गत परसबाग भाजीपाला बियाणे मिनी किटचे वाटप करून घरच्या परसबागेत सेंद्रिय पद्धतीने बियाण्याचे लागवड करून स्वतःसाठी विषमुक्त भाजीपाला तयार करण्याचे सुचविले.सदर कार्यक्रमास सालगावच्या उपसरपंच श्रीमती प्रमिला गव्हाणे ,पोलीस पाटील श्रीमती वसुधा गव्हाणे त्याचप्रमाणे घोडेगाव मंडळातील सर्व कर्मचारी उपस्थित होते

Previous articleआर्ट ऑफ लिविंग व शाश्वत विकास फाउंडेशन यांच्या मार्फत माजी सभापती प्रकाश जगताप व जेष्ठ नेते माधव काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड
Next articleशेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करून पिकांचे उत्पादन घ्यावे – पुनम सरकाळे-दुधाडे