शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करून पिकांचे उत्पादन घ्यावे – पुनम सरकाळे-दुधाडे

उरुळी कांचन

आळंदी म्हातोबाची येथे कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत प्रगतशील शेतकरी संवाद दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपसंचालक निविष्ठा व गुणनियंत्रण कृषि आयुक्तालय पुणे पुनम सरकाळे-दुधाडे यांनी खतांचा संतुलित वापर,पिकांना खते देण्याची पद्धत, खतांची मात्रा विभागुन देणे बाबतचे आवाहन त्यांनी केले.

हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी शेतकरी संवाद दिन कार्यक्रमात सहभाग नोंदवुन शेतकऱ्यांनी कांदाचाळ, कृषि यांत्रिकीकरण योजना,सुक्ष्म सिंचन योजना, सेंद्रिय शेती प्रकल्प, खपली गहू उत्पादन, बाजरी प्रकल्प, सेंद्रिय भाजीपाला परसबाग मिनीकीट प्रात्य क्षिके, मधुमक्षीका पालन, कांदा बिजोत्पादन कार्यक्रम व इतर कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मंडळ कृषि अधिकारी हडपसर गुलाबराव कडलग यांनी कृषि विभागाच्या विविध योजना,एकरी १०० टन ऊस उत्पादन, सेंद्रिय शेती, ऊस पाचट व्यवस्थापन, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चरचा वापर व उत्पादन, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड गांडुळ खत प्रकल्प नाडेप खत प्रकल्प नाडेप खत प्रकल्प, विहीर पुनर्भरण कार्यक्रम बाबत मार्गदर्शन केले.

कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ मेघराज वाळुंजकर यांनी एकात्मिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती काळाची गरज, सेंद्रिय शेती शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चरचा वापर व उत्पादन, खपली गहु पिक प्रात्यक्षिके, जिवाणू कल्चरच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रगतशील शेतकरी संवाद दिन कार्यक्रमात सहभागी झालेले लोणी काळभोर येथील विनोद शेंडगे, उत्तम दुंडे व आळंदी म्हातोबाची येथील विजय जवळकर, लक्ष्मण खटाटे, ज्ञानेश्वर जवळकर, यांनी नैसर्गिक शेती पद्धती, खपली गहु उत्पादन, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चर, भेंडी व कांदा बिजोत्पादन, सेंद्रिय भाजीपाला उत्पादन व विक्री व्यवस्थापन बाबत सविस्तर चर्चा केली.सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी सिध्देश्वर अवचर, कृषि सेवक आळंदी म्हातोबाची व नागेश म्हेत्रे, कृषि सहाय्यक, तरडे यांनी यशस्वीपणे केले.

सदर कार्यक्रमास माजी सरपंच परशुराम जवळकर, शिवाजी खंडेराव जवळकर, ज्ञानेश्वर जवळकर,विजय जवळकर, केदार तिखे, दिपक झेंडे, लक्ष्मण खटाटे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleबाभुळवाडी (साल) येथे कृषी संजीवनी कार्यक्रम संपन्न
Next articleकेसनंद येथे एकाच दिवशी ९ अनाधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा