केसनंद येथे एकाच दिवशी ९ अनाधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा

विशेष प्रतिनिधी

पुर्व हवेलीतील मौजे केसनंद गावच्या हद्दीतील गट नंबर १०१ व १०२ येथील मंगलमूर्ती वास्तु प्रा.लि यांच्या ‘जोगेश्वरी सनसिटी’ या प्लॉटिंगमधील अनाधिकृत बांधकामावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत कारवाई करण्यात आली.वाणिज्य स्वरूपाची चार, तसेच सध्या चालू असणारी पाच अनाधिकृत बांधकामे असे एकूण सुमारे १०४५० स्क्वेअर फुटाची बांधकामे निष्कासित करण्यात आली.

PMRDA च्यावतीने अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती.सदर निष्कासन कारवाई पाच पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली.यावेळी अतिक्रमण विभागाच्यावतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Previous articleशेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करून पिकांचे उत्पादन घ्यावे – पुनम सरकाळे-दुधाडे
Next articleसबनीस विद्यालयात मनस्वास्थ्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन