सबनीस विद्यालयात मनस्वास्थ्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

नारायणगाव : (किरण वाजगे)

ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस
विद्यामंदिरामध्ये इंडियन सायकीयाट्रिक सोसायटी, वेस्टर्न झोनल ब्रांच यांच्यावतीने “गाव तिथे मानसोपचार” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मनस्वास्थ्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. प्रणवजीत काळदाते, मिलिंद कारंजकर, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सातपुते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी विद्यामंदिराचे पर्यवेक्षक रामचंद्र शेगर, सतीश तंवर सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य संवर्धनासाठी व्यायाम व मैदानी खेळ, सकस आहार, झोपेचे महत्त्व, सकारात्मक विचार, वेळेचे नियोजन, व्यसनांपासून दूर राहणे, छंद जोपासना इत्यादी विषयांवर डॉ. प्रणवजीत काळदाते यांनी मार्गदर्शन केले. तसेच किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य, ताण-तणावाचे नियोजन, अभ्यास व परीक्षांचे नियोजन, मैत्री संगत व परिणाम इत्यादी विषयांवर मिलिंद कारंजकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय,पुणे यांनी प्रकाशित केलेल्या शालेय मानसिक आरोग्य पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाप्रमुख भिमराव पालवे यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक सतीश तंवर यांनी केले व आभार पर्यवेक्षक रामचंद्र शेगर यांनी मानले.

Previous articleकेसनंद येथे एकाच दिवशी ९ अनाधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा
Next articleभंडारी कुटूंबाकडून अष्टापूर येथील अंगणवाड्यांना साहित्याची मदत