भंडारी कुटूंबाकडून अष्टापूर येथील अंगणवाड्यांना साहित्याची मदत

उरुळी कांचन

अष्टापुर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मल्लिकार्जुन भंडारी, जयश्री भंडारी यांच्या हस्ते व त्यांचे चिरंजीव राकेश मल्लिकार्जुन भंडारी यांच्या वतीने अष्टापुर गावाच्या विकासासाठी स्वतःचा काहीतरी हातभार लावावा म्हणून आष्टापूरचे सरपंच कविता योगेश जगताप, उपसरपंच सुभाष कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, सदस्य अश्विनी कोतवाल, अष्टापूर ग्रामस्थ गणेश सुभाष कोतवाल, महेश ढवळे यांच्याकडे रोख स्वरुपात २५ हजार रुपये देणगी दिली.

या देणगी मधून अष्टापुर गावांमधील चारही अंगणवाड्या करता लागणारे साहित्याचे वाटप अष्टापूरच्या सरपंच कविता जगताप, योगेश जगताप उपसरपंच सुभाष कोतवाल, माजी सरपंच रमेश कारभारी कोतवाल, अष्टापूरचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य, देणगीदार, अश्विनी कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते गणेश सुभाष कोतवाल, महेश ढवळे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या व देणगीदार मल्लिकार्जुन भंडारी, जयश्री भंडारी यांचे चिरंजीव महेश भंडारी व मधुबाला भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.

Previous articleसबनीस विद्यालयात मनस्वास्थ्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Next articleभाजपने राज्यात सत्ता स्थापन केल्याने पुर्व हवेलीत आनंदोत्सवाचे आयोजन – तालुका अध्यक्ष भाजप संदिप भोंडवे