भाजपने राज्यात सत्ता स्थापन केल्याने पुर्व हवेलीत आनंदोत्सवाचे आयोजन – तालुका अध्यक्ष भाजप संदिप भोंडवे

उरुळी कांचन

भाजपा ने राज्यात सत्ता स्थापन केल्याने पुर्व हवेलीमधील कार्यकर्त्यांना अत्यानंद झाला असुन तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी व पुर्व हवेलीमधील नागरिकांना आनंदोत्सवामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद , प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहीदास उंद्रे व धर्मेंद्र खांडरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ३ जूलै रोजी तुळापुर – पेरणे – न्हावी – सांगवी – अष्टापुर फाटा – वाडेबोल्हाई – केसंदन – वाघोली – केसनंद – थेऊर – कदमवाक वस्ती – लोणीकाळभोर – कुंजीरवाडी व उरुळी कांचन अशी चारचाकी गाड्यांची रॅली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले. पुर्व हवेली मधील सर्व भाजपा नेते , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या चारचाकी गाड्यांच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम पत्रिका सकाळी तुळापुर ९.३० ते १.०० – रॅली प्रवास असा दिनक्रम असेल. या वेळी सुनिल पाटील कांचन, शामराव गावडे, विकास जगताप, सुदर्शन चौधरी, अमित कांचन, शिवाजी महाडिक, आबासाहेब चव्हाण, सुनिल तुपे, अतुल मोरे, शुभम वलटे, सोहम जगताप, पुजा सणस आदी उपस्थित होते.

Previous articleभंडारी कुटूंबाकडून अष्टापूर येथील अंगणवाड्यांना साहित्याची मदत
Next articleबार मध्ये घुसून मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील “कोयता गॅंग” च्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक