कृषी व महसूल विभागाच्या वतीने पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत

उरुळी कांचन

अतिवृष्टीमुळे श्रीप्रयागधाम नायगाव पेठ गावामध्ये भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे पूर्ण झाले. तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामे पार पडले. मुख्यत्वे भाजीपाला पिकाला अतिवृष्टीमुळे फटका बसला असून पालक पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे पालक ची आवक घटून भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी यावर्षी तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी महसूल विभागास ३३ टक्के, कृषी विभागास ३३टक्के व ग्रामविकास विभागास तेथेच टक्के गावांचे वाटप केले होते.

त्या अंतर्गत पेठ गावाचे पंचनामे कृषी सहाय्यक महेश सुरडकर, नायगाव गावाचे पंचनामे ग्रामसेवक विजया भगत, सोरतापवाडी गावाचे पंचनामे ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड व प्रयागधाम गावाचे पंचनामे ग्रामसेवक स्मिता वीरकर यांनी पार पाडले. याकरिता तलाठी निवृत्ती गवारी, ग्रामसेवक नंदकुमार चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी रवी जाधव, गणेश चौधरी, पंढरीनाथ चौधरी, अविनाश मेमाणे, प्रसाद ठाकर, दिपाली खेडेकर यांनी सहकार्य केले. पेठ चे सरपंच तानाजी चौधरी, माजी सरपंच सूरज चौधरी, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, उपसरपंच जयश्री चौधरी, ग्रामपंचायत सदस्य काळूराम चौधरी, आदर्श सरपंच महादेव चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शोभाताई चौधरी , बापुसो चौधरी, निलेश चौधरी इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये पंचनामे पार पडले. सर्व पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.- पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी.

Previous articleउरुळी कांचन मध्ये नवरात्र उत्सव निमित्ताने कलासंस्कृती ग्रुपची स्थापना आणि उदघाटन सोहळा संपन्न
Next articleमाजी विद्यार्थी या नात्याने प्रत्येक विद्यार्थी यांनी आपण घेतलेल्या शिक्षण संस्थेस मदत करावी–सुदर्शन चौधरी