उरुळी कांचन मध्ये नवरात्र उत्सव निमित्ताने कलासंस्कृती ग्रुपची स्थापना आणि उदघाटन सोहळा संपन्न

उरुळी कांचन

उरुळी कांचन मध्ये कलासंस्कृती ग्रुपची स्थापना आणि उदघाटन सोहळा मेमाणे फार्म हाऊस येथे पार पडला. कलासंस्कृती ग्रुप हा महिलांनी महिला आणि युवतींसाठी तयार केलेले खुले व्यासपीठ आहे. आपली मराठ मोळी संस्कृती जी लोप पावत आहे त्याची ओळख आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला व्हावी आणि आपली संस्कृतीचे जतन व्हावे हा एक उद्देश आणि यातून महिलांचे पारंपरिक खेळ, शिवकालीन युद्धकला याचे प्रशिक्षण युवती आणि महिलांना द्यायचा संकल्प आहे.

हा असा ग्रुप उरुळी कांचन पंचक्रोशीमध्ये पहिलाच आहे. आणि यातील सभासद महिला पण प्रत्येक राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शेतकरी, नोकरदार, गृहिणी क्षेत्रातली आहे . कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी उपसरपंच संचिता कांचन, माजी ग्रामपंचायत सदस्या सारीका मुरकुटे, विजया कोलते, शारदा गोगावले आणि गायकवाड आज्जी यांच्या हस्ते झाले.

यातील सभासद विजया कोलते, शारदा गोगावले, सविता कांचन, ज्योती झुरंगे, शुभांगी मेमाणे, नीता खराडे, स्वाती चौधरी सारिका मुरकुटे, शिल्पा पाटील, रेखा तुपे, योगिता टिळेकर रोहिणी गाडे, अनिता चौधरी कल्पना वाडेकर, रेखा चौधरी, पूजा तोडकर, रुपाली चौधरी, त्रिवेणी कांचन, सुरेखा कांचन, तनुजा कांचन आदी महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Previous articleकायद्याविषयी जागृती काळाची गरज या विषयावर पद्यश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात पिंकी राजगुरु यांचे व्याख्यान
Next articleकृषी व महसूल विभागाच्या वतीने पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत