कायद्याविषयी जागृती काळाची गरज या विषयावर पद्यश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात पिंकी राजगुरु यांचे व्याख्यान

उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित, पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन या महाविद्यालयात ‘महिला कक्ष’ विभाग व IQAC विभाग यांच्यावतीने ‘कायद्याविषयी जागृती काळाची गरज’’ या विषयावर ॲड. पिंकी राजगुरु यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत होते. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर होते. कार्यक्रमाचे आयोजन ‘महिला कक्ष’ विभाग समन्वयक प्रा सुजाता गायकवाड व IQAC विभाग समन्वयक प्रा. नंदकिशोर मेटे यांनी केले.

ॲड. पिंकी राजगुरु यांनी आपल्या व्याख्यानातून महिलांविषयींचे कायदे, महिलांच्या समस्या, तक्रार निवारण, अँटी रॅगिंग, सायबर क्राईम याविषयी माहिती दिली. महिलांनी सक्षमपणे आपली मते मांडावीत, महिलांविषयींच्या कायद्यांचा आधार घेऊन अन्यायाचा प्रतिकार करावा व आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगतून प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्व पटवून दिले व विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती घ्यावी, आजच्या आधुनिक काळात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. अनुप्रिता भोर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सारिका ढोनगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शुभांगी रानवडे यांनी केले. यावेळी प्रा. अंजली शिंदे, प्रा. कमरुन्निसा शेख, प्रा. वैशाली चौधरी, प्रा अनुजा झाटे, प्रा.श्रेया चव्हाण , प्रा.विजय कानकाटे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. प्रदीप राजपूत व श्री. विशाल महाडिक या सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .

Previous articleमहाराष्ट्रात वेतन कोड व सामाजिक सुरक्षा कोड त्वरित लागु करून कामगारांना न्याय देण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी
Next articleउरुळी कांचन मध्ये नवरात्र उत्सव निमित्ताने कलासंस्कृती ग्रुपची स्थापना आणि उदघाटन सोहळा संपन्न