मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थनार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांचे नेतृत्वात बाईक रॅली

योगेश राऊत ,पाटस

केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा केलेला डाव उधळून लावण्यासाठी सत्तापिपासू भाजपा व शिवसेनेतील बंडखोर गद्दारां विरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थनार्थ मंगळवार दि.२८ रोजी स. १० वा. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथून दौंड तालुक्यातील वाखारी, केडगाव, चौफुला, वरवंड ,पाटस या गावामधून मार्गक्रमण करित दौंड शहरापर्यंत हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली.

यावेळी शिवसैनिकांनी हातात भगवे झेंडे फडकावून तालुक्यातील चौका चौकामधून निष्ठेला साथ..! गद्दारीला लाथ..! पाठीवर आमच्या बाळासाहेबांचा हात..! जागवले मावळे..! पेटवला वनवा..! गद्दारांना नमवून फडकवणार भगवा..! जय भवानी जय शिवाजी ! मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो ! हम तुम्हारे साथ है … शिवसेना अंगार है…बाकी सब भंगार है… या घोषणा देऊन दौंड तालुक्यातील परिसर दणाणून सोडला.

रॅलीमधील दरम्यान वरवंड व पाटस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व दौंड शहरातून रॅली काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल तात्या सोनवणे, शरद सुर्यवंशी,दौंड शहर प्रमुख आनंद पळसे यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी सहभागी पदाधिकारी व शिवसैनिकांनी …आम्ही कोणाचे समर्थक नाही …तर शिवसैनिक आहोत.‌‌..केलाच जयघोष तर आम्ही शिवसेनेचा जयघोष करू. गुवाहाटी मध्ये जाऊन पक्षाशी गद्दारी केलेल्या बंडखोरांच्या समर्थकांची निष्ठा त्यांच्या नेत्यांबरोबर विकली आहे. आम्ही शिवसैनिक नेहमी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत राहू असा विश्वास यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.

Previous articleशेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करावा- विकास पाटील
Next articleआर्ट ऑफ लिविंग व शाश्वत विकास फाउंडेशन यांच्या मार्फत माजी सभापती प्रकाश जगताप व जेष्ठ नेते माधव काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड