शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करावा- विकास पाटील

उरुळी कांचन

फुरसुंगी येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषि अधिकारी सत्यवान नर्हे, तालुका कृषि अधिकारी हवेली मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या मार्फत कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत खतांचा संतुलित वापर दिन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. त्यावेळी कृषि विस्तार व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य संचालक विकास पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जमीन आरोग्य पत्रिका, जमीन सुपिकता निर्देशांक, कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, जिवाणू संवर्धक खतांचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर, सुक्ष्म अन्नद्रवव्यांची विविध पिकांमधील कमतरता व उपाययोजना, खतांच्या योग्य मात्रा पिकांना विविध वाढीच्या अवस्थेत विभागुन देणे, विद्राव्य खतांचा वापर , सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून विद्राव्य खतांचा संतुलित वापर केल्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढुन पिक उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होईल तसेच जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, पिकांची फेरपालट,जिवाणू संवर्धक खतांचा वापर, रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीनुसार वापर करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विभागीय कृषि सहसंचालक पुणे रफिक नाईकवाडी यांनी खतांचा संतुलित वापर, ऊस पाचट व्यवस्थापन, कृषि अन्न प्रक्रिया बाबत मार्गदर्शन करुन परसबाग भाजीपाला मिनीकीट चे वाटप उपस्थित शेतकऱ्यांना केले. श्रीमती पुनम सरकाळे-दुधाडे, उपसंचालक निविष्ठा व गुणनियंत्रण कृषि आयुक्तालय पुणे यांनी जमीन आरोग्य पत्रिका, माती परीक्षण, शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळखत चा वापर करणे,जमीनीतील उपयुक्त सुक्ष्म जिवाणू, पिकांच्या गरजेनुसार खतांच्या मात्रा शिफारशीनुसार देणण्याबाबत मार्गदर्शन केले.

उपविभागीय कृषि अधिकारी, पुणे सत्यवान नर्हे यांनी खतांचा संतुलित वापर, महाडीबीटी पोर्टल वरील कृषि यांत्रिकीकरण योजना, ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना, सेंद्रिय शेती पद्धती चा अवलंब करून रासायनिक खतांचा वापर कमी करावा असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.तालुका कृषि अधिकारी हवेली मारुती साळे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तेजोमय घाटगे जिल्हा संसाधन व्यक्ती, यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत विविध कृषि प्रक्रिया उद्योग, शेतकरी प्रशिक्षण, सामाईक सुविधा केंद्र उभारणी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी बाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. मंडळ कृषि अधिकारी हडपसर गुलाबराव कडलग यांनी खतांचा संतुलित वापर करताना जिवाणू संवर्धक खतांचा वापर करून सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चरचा वापर करून पाचट व्यवस्थापन, कंपोस्ट खत तयार करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ मेघराज वाळुंजकर यांनी एकात्मिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती, जैविक शेती, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चरचा वापर, आत्मा अंतर्गत घेण्यात आलेल्या खपली गहु पिक प्रात्यक्षिके, सेंद्रिय भाजीपाला पिक प्रात्यक्षिके, वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चर निर्मिती व वापर बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

शशीकांत भोर , प्रगतशील शेतकरी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी व वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चरचा वापर बाबत मार्गदर्शन केले.

जगन्नथ कामठे यांनी खपली गहु पिक प्रात्यक्षिक व ऊस पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक बाबत समाधान व्यक्त केले. तसेच सतीश पवार यांनी खपली गहु पिक प्रात्यक्षिक बाबत समाधान व्यक्त करुन कृषि विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले. बाळासाहेब पवार, प्रगतशील शेतकरी यांनी ऊस पाचट व्यवस्थापन व वेस्ट डिकंपोजर जिवाणू कल्चरचा वापर करून सेंद्रिय खत निर्मिती बाबत समाधान व्यक्त केले व शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करणेबाबत आवाहन केले.

सदर कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक हडपसर-२ रामदास डावखर, कृषि सहाय्यक पुष्पा जाधव, मुक्ता गर्जे, नागेश म्हेत्रे, राजेंद्र भोसेकर, शंकर चव्हाण, महेश सुरडकर, महेश महाडीक, अमित साळुंके, बापुसाहेब भेलुसे, आप्पासाहेब हरपळे, शाम भापकर, संतोष हरपळे, सुरेश पवार, माऊली पवार, राणुजी झेंडे, सुनिल साबळे, सतीष हरपळे, संभाजी हरपळे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleआंबेगाव तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह
Next articleमुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थनार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांचे नेतृत्वात बाईक रॅली