आंबेगाव तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह

आंबेगाव : –

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि.२५/०६/२०२२ ते १/०७/२०२२ या कालावधीत श्री.टी.के.चौधरी तालुका कृषी अधिकारी आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम या कालावधीत आंबेगाव तालुक्यातील सर्व गावात राबविण्यास सुरुवात झाली आहे.या कार्यक्रमामध्ये कृषी विभागाचे कर्मचारी व कृषी विद्यापीठाचे शास्रज्ञ शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार व कृषी विभागाच्या विविध योजना शेतकर्यांना पोहोचवणार असल्याबाबत श्री.टी.के.चौधरी तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ घोडेगाव मंडळ कार्यक्षेत्रात दि.२५/०६/२०२२ रोजी ठाकरवाडी (चास) या गावापासून करण्यात आला .या कार्याक्रमाचे प्रास्ताविक अशोक बाळसराफ कृषी पर्यवेक्षक यांनी केले.

या कार्यक्रमामध्ये सोयाबीन बियाण्यावर रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया व रुंद सरी वरंभा वर टोकन यंत्राद्वारे सोयाबीन लागवड प्रत्यक्ष विलास नथू बारवे यांच्या शेतावर प्रात्यक्षिक रोहन शेटे कृषी सहाय्यक यांनी करून दाखविले.कृषी विभागाच्या महाडीबिटी मधील सर्व योजना,प्रधानमंत्री सुश्मअन्न प्रक्रिया उद्योग योजना,पिक विमा,गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना या विषयी सविस्तर मार्गदर्शन प्रवीण मुंढे मंडळ कृषी अधिकारी यांनी केले या कार्यक्रमासाठी बबन बारवे सरपंच,नारायन बारवे,विजय बारवे,दिनकर बारवे,सुरेश बारवे,खंडू बारवे,मारुती बारवे,वैभव बारवे,छबु लोहकरे,सुशील बारवे,उल्हास बारवे हे प्रगतशील शेतकरी उपस्थित होते तसेच कृषी विभागातील कृषी सहाय्यक पप्पू उगले,अमोल खमसे,नागेश मोहरे,विठ्ठल तळपे उपस्थित होते.

Previous articleआंबेगाव तालुक्यात रेशनिंग कार्डधारकांना मागिल दोन ते तीन महिन्यांपासून अनेक अडचणीं- डॉ. निलम गावडे
Next articleशेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करावा- विकास पाटील