कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संवाद कौशल्य आवश्यक- राजेंद्र कोंढरे

दिनेश पवार – दौंड

वेगवान स्पर्धेच्या युगात कर्तृत्व सिध्द करण्यासाठी वाचन,चिंतन,संवाद कौशल्य युवकांनी आत्मसात करावे असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी नीरा जि. पुणे येथे आयोजित जाहीर सत्कार व सन्मान सोहळ्यात व्यक्त केले,राजेंद्र कोंढरे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नीरा येथे जाहीर सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जेष्ठ साहित्यीक बोधे सर,पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड,ढमाळ यांचा सत्कार करण्यात आला,पुणे शहर अध्यक्ष गुलाबदादा गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप,महिला जिल्हा अध्यक्ष प्रियांका काटे यांनी मनोगत व्यक्त केले.


यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नाना जगताप,शिक्षक आघाडी जिल्हा अध्यक्ष आदिनाथ थोरात,पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम बाबा पवार, दौंड तालुका अध्यक्ष दादासाहेब नांदखिले,उमेश वीर,प्रसाद गायकवाड,विनायक सुंबे,युवक अध्यक्ष विकास जगदाळे,शहर अध्यक्ष शैलेश पवार,रोहन घोरपडे,संदीप जगताप,किसन काळे,रोहिदास काळे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी केले तर आभार पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जेधे यांनी मानले.

Previous articleबार मध्ये घुसून मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील “कोयता गॅंग” च्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
Next article“एकच ध्यास, झाडे लावा झाडे जगवा : पिंपळे जगताप येथील धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पात ५०० देशी वृक्षांची लागवड