थेऊरला तरुणीची दगडाने ठेचून हत्या

उरुळी कांचन

थेऊर येथे एका तरूणीची दगडाने ठेचून निर्घुनपणे हत्या करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली आहे. थेऊर पोलीस चौकीच्या समोर असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत सदर अंदाजे १८ ते २२ वर्षे वयाच्या तरूणीचा मृतदेह आढळून आला आहे. तिची ओळख पटलेली नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर चौकी व चिंतामणी हायस्कूल समोर यशवंत सहकारी साखर कारखान्याची मोकळी जागा आहे. मंगळवारी पहाटे नागरिकांना सदर मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी सदर बाब तात्काळ लोणी काळभोर पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. डॉग स्कॉड पथकास पाचारण करण्यात आले आहे.

Previous article२०,२१ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार- एस.एम देशमुख
Next articleप्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला