Home Blog Page 97

डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्यासाठी व तंदुरुस्तीसाठी वेळ द्यावा : आ.अतुल बेनके

नारायणगाव : (किरण वाजगे)

“दुसऱ्यांच्या आरोग्याची धुरा सांभाळणारे डॉक्टरच सध्या अधिक तणावाखाली असलेले दिसतात. स्वतःच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी , आनंदी राहण्यासाठी आणि स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरांनी स्वतःला देखील वेळ द्यायला हवा.”असे मत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी केले.

जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या नविन कार्यकारिणीचा २०२२-२३ या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला.या कार्यक्रमात आमदार अतुल बेनके बोलत होते

या वेळी आमदार बेनके म्हणाले की , “डॉक्टरांना आधीच तणाव असतो.त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा तणावयुक्त आणि चिंताग्रस्त चेहरा घेऊन येतो.त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर देखील दुःखी असतात.डॉक्टरांनी दुःखी होऊन बसलं नाही पाहिजे.डॉक्टरांनी कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे, आहार व व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे.डॉक्टरांनी ध्यानधारणा करत स्वतःला आनंदी ठेवून नेहमी हसतमुख राहिले पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने तणावमुक्त आनंदी जीवनाची सुरुवात सुरुवात होईल.”

यावेळी ज्येष्ठ व्याख्याते प्रा वसंतराव हंकारे यांनी देखील सध्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेला ताण-तणाव यामुळे सर्वांच्याच वाटेला आलेली विनाकारण ची धावपळ याविषयी कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली.

या कार्यक्रमाला जेटीएमपीए ट्रस्टचे चेअरमन डॉ.अजित वल्हवणकर, माजी अध्यक्ष डॉ.लुकेश खोत, स्टर्लिंग हॉस्पिटल निगडी येथील कॅन्सर तज्ञ डॉ.अंकोलीकर, फिजिशियन डॉ. अभिषेक करमाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बेनके म्हणाले की, “जेटीएमपीएसाठी जुन्नर तालुक्यात कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.तालुक्यातील डॉक्टरांच्या मिटिंग साठी तसेच वार्षिक कार्यक्रमांसाठी योग्य जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.बायोमेडिकल वेस्टची समस्या सोडवण्यासाठी जुन्नर , आंबेगाव आणि खेड असे तिन्ही तालुक्यांमिळून एकत्र प्रकल्प निर्माण करू.डॉक्टरांची कोणतीही समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

जेटीएमपीएच्या २०२२-२३ या वर्षासाठी अध्यक्षपदी डॉ.हनुमंत भोसले,उपाध्यक्षपदी डॉ.आनंद सराईकर, सेक्रेटरीपदी डॉ. निलेश थोरात आणि खजिनदारपदी डॉ.पिंकी पंजाब कथे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे.जेटीएमपीएचे नूतन अध्यक्ष डॉ.हनुमंत भोसले यांनी या वेळी या वर्षात घेण्यात येणाऱ्या नवनवीन कार्यक्रमांची माहिती दिली.

जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचा हा ३६ वा पदग्रहण समारंभ पार पडला.या कार्यक्रमात नारायणगाव येथील ज्येष्ठ डॉक्टर डॉ.एस. जी गोसावी यांना ‘श्रेष्ठ धन्वंतरी पुरस्कार’ देण्यात आला.स्टरलिंग हॉस्पिटल निगडीचे डायरेक्टर डॉ.श्रीकांत अंकोलीकर आणि डॉ. अभिषेक करमाळकर यांची यावेळी वैद्यकीय विषयांवर व्याख्याने झाली.जुन्नर तालुक्यातील सुमारे ४०० डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते.

“पुढील कार्यकाळात डॉक्टरांच्या कुटुंबांसाठी विविध उपक्रम घेण्यात येतील.डॉक्टरांचे मानसिक स्वास्थ्य आणि डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल.समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल. अशी माहिती डॉ हनुमंत भोसले यांनी यावेळी दिली.
डॉ. स्मिता डोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ.सराईकर यांनी आभार मानले.

वाघोली परिसरात सीएनजी पंप चालकाला चार जणांकडून मारहाण

विशेष प्रतिनीधी

वाघोली( तालुका-हवेली)परिसरात पुणे नगर महामार्गावरील खांदवे नगर येथील सी.एन.जी पंप चालक राजू भरत वारघडे यांना चार जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत राजू वारघडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ११/०७/२०२२ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान राजू वारघडे आपल्या पंपाच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे काम करत असताना पंपावर गाड्यांची खुप गर्दी असल्याने वाहनचालकांना लाईन मध्ये येण्यासाठी सांगत असताना एक मारुती इको गाडी अचानक लाईनच्या विरुद्ध बाजुने पंपावर आली.तेव्हा वारघडे यांनी गाडी चालक याला गाडी लाईन मध्ये पुढे घे असे सांगितले.तेव्हा त्याने सी.एन.जी भारायचा आहे,असे म्हणल्यानंतर वारघडे यांनी त्यास तुम्ही लाईन मध्ये या सी. एन. जी तुम्हाला जरुर मिळेल असे सांगितले.तेव्हा ती व्यक्ती राजू वारघडे यांना म्हणाली मी खांदवेनगरचा राहणारा आहे. तुम्ही मला ओळखत नाही का? असे म्हणुन राजू वारघडे यांच्याशी हुज्जत घालू लागल्याने वारघडे यांनी त्याला लाईन मध्ये सी.एन.जी भरायचा नसेल तर दुसरी कड़े भरुन घे असे सांगितले. तेव्हा त्याने वारघडे यांना “तु १० मिनिट थांब, तुला दाखवतो” असे म्हणुन धमकी देऊन तो गाडी घेऊन गेला. त्यानंतर १० ते १५ मिनिटांत परत मारुती इको गाडी पंपावर आली त्यामागुन बुलेट वरुन आणखी दोन इसम असे चारजण आले व त्यातील काळा शर्ट घातलेल्या इसमाने राजू वारघडे यांना शिवीगाळ सुरु केली व यानेच मला सी. एन. जी भरुन दिला नाही असे बाकीच्यांना सांगुन त्याच्या हातात असलेल्या कोणत्या तरी लोखंडी वस्तुने वारघडे यांच्या तोंडावर मारले तेव्हा वारघडे यांच्या तोंडातुन रक्त येऊ लागले. तेव्हड्यात त्याच्या बरोबर असलेल्या तिघांनी त्याच्या हातात असलेल्या लाकडाने देखील वारघडे यांना मारहाण करुन जखमी केले. त्यावेळे वारघडे यांचा मेव्हणा ऋषिकेश मनोहर पठारे हा वाचवण्यासाठी मध्ये आला असता त्यालाही त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले.यावेळी वारघडे यांनी कशीतरी त्यांच्यापासुन सुटका करुन पंपावर असलेल्या ऑफिसच्या बाथरुम मध्ये गेले.तेव्हा गोंधळ सुरु असताना तेथील कोणीतरी पोलीसांना फोन करुन बोलावले असता पोलीस त्याठिकाणी आले.पोलीसांची चाहूल लागतात ते सर्वजण पळून जावु लागले तेव्हा त्यातील एकाला पोलीसांनी पकडले व बाकी तीन जण पळून गेले. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संभाजी भाऊसाहेब सानप (रा.सोमेश्वर नगर, लोणीकंद,पुणे) असे सांगितले बाकीच्यांचे नाव विचारले असता त्याने महेश कंद( रा. बारावा मैल,लोणीकंद, पुणे) सुंदर कांबळे (रा. खांदवेनगर,वाघोली,पुणे) सागर पूर्ण नाव माहित नाही (रा. केडगाव अ.नगर) असे सांगितले.

याबाबत वारघडे यांनी संभाजी भाऊसाहेब सानप (रा. सोमेश्वर नगर,लोणीकंद, पुणे) महेश कंद (रा. बारावा मैल,लोणीकंद, पुणे) सुंदर कांबळे ( रा. खांदवेनगर, वाघोली,पुणे) ४) सागर पुर्ण नाव माहित नाही (रा. केडगाव अ.नगर) यांच्या विरुध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत.

जुन्नरच्या आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे एक युवक ओढ्यात गेला वाहून

नारायणगाव (किरण वाजगे)

गेली पाच-सहा दिवसापासून राज्यात संततधार पाऊस सुरु आहे. जुन्नर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम आदिवासी भागातील गोद्रे येथील ओढ्याला आलेल्या पुरा मध्ये एकनाथ बबन रेंगडे ही व्यक्ती अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे ओढ्यात वाहत गेली. सुमारे १५ ते २० मिनिटे ओढ्याच्या पाण्यात वाहत जाऊन ही व्यक्ती ओढ्याच्या किनाऱ्याला मिळाली. सुदैवाने ती व्यक्ती बचावली असून त्यांना पायाला व गुढग्याला इजा झाली आहे.

गोदरे या ठिकाणी जिथे ही घटना घडली तेथे पूल बांधण्याची गावकऱ्यांनी अनेकदा मागणी केली होती. परंतु प्रशासनाने योग्य वेळी दखल न घेतल्यामुळे व पुल न झाल्यामुळे येथे काही जनावरे देखील वाहून गेल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.

दरम्यान पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या तसेच डोंगर उतारावर राहणाऱ्या व घाटमाथ्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा म्हणून महिला मैत्री ग्रुपच्या  वतीने मराठी शाळेस शोकेस कपाट भेट

गुरु पौर्णिमाचे औचित्य साधून घोडेगाव महिला मैत्री ग्रुपच्या वतीने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.प्रथम विद्येची देवता माँ सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले श्री राजाराम काथेर यांनी प्रास्ताविक करून गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून द्रोणाचार्य व एकलव्य यांची गोष्ट सांगितली.

त्यानंतर सौ. अँड गायत्री काळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत आल्यावर आमची शाळा आठवल्याचे आवर्जुन सांगितले माजी सरपंच रुपाली ताई झोडगे व विद्यमान सरपंच क्रांतीताई गाढवे यांनी गुरुपोर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना आई वडील व गुरुजनांचा सन्मान करण्याचा कानमंत्र दिला त्यानंतर सर्व घोडेगाव महिला मैत्री ग्रुपच्या सदस्यांनी सर्व गुरुजनांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान केला तसेच शाळेच्या वतीने रूपालीताई झोडगे शरद सहकारी बँकेत संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा साल गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
शाळेच्या वतीने सर्व मैत्री ग्रुपच्या महिला मंडळाचा गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला सर्व मैत्री ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुदक्षिणा म्हणून शोकेसची कपाट भेट देण्यात आले.

या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक रजंनाताई वाघ ,घोडेगावचे लोकनियुक्त सरपंच क्रांती गाढवे, घोडेगाव पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीचे अध्यक्षा रत्नाताई गाडे, शरद सहकारी बँकेचे विदयमान संचालिका रुपाली झोडगे,अनुसया उन्नती केंद्र आंबेगावच्या संचालिका ज्योती घोडेकर, अँड गायत्री काळे ,डॉ माणिक पोखरकर, माधवी कर्पे ,शुभांगी बेलापूरकर,अंजली आंधळे ,शोभा सोमवंशी, वैशाली गांधी, निर्मला शेटे , श्यामली सुतार ,मुख्याध्यापक अलका चासकर , उप शिक्षक राजाराम काथेर, लालिता शेळके , नंदा काठे , सुनिता काठे आदि सह शाळेतील चिमुकले विदयार्थी व विदयार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मानव विकास परिषदेच्या आंबेगाव तालुकाध्यक्षपदी राम फलके यांची निवड

आंबेगाव तालुक्यातील अमोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते राम सोपान फलके यांची मानव विकास परिषदेच्या आंबेगाव तालुका अध्यक्ष पदी नव्याने निवड करण्यात आली. मानव विकास परिषद म्हणजे शोषित, श्रमिक, पोलिस कोठडीत मृत्यु बेकायदेशिर अटक शोषण गुलामगिरी दहशत मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याच प्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक मानवी हक्कांचे उल्लंघन शासकीय आधिकाराचा गैरवापर,भांडवलशाही कडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील आहेत व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत आहे

मानव विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांच्या आदेशाने व राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक चौधरी ,राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे,व प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर व प्रदेश सचिव डॉ सचिन सूर्यवंशी व प्रदेश कार्याध्यक्ष असलम सय्यद, युवा प्रदेशाध्यक्ष अंकुर कदम, जयश्री अहिरे मॅडम महिला प्रदेश अध्यक्ष. संमतीने अन्सार शेख राष्ट्रीय संपर्कप्रमुख तसेच संस्थेचे खजिनदार अलीम सय्यद यांच्या सहमतीने यांच्या प्रर्यत्नाने राम सोपान फलके यांना आंबेगाव तालुकअध्यक्ष या पदी दि १३ / ७ / २० २२ ते १३ / ७ / २० २३ या कालावधी करीता त्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांचे.मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

बाजी प्रभू देशपांडेंना टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांचे पावनखिंडीत वंदन

राजगुरूनगर – छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड ही तब्बल ५० किलोमीटरची ऐतिहासिक पदभ्रमंती करून “पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड” रणसंग्रामात वीरमरण स्विकारणारे शिवा काशिद आणि “लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” अशी स्वामीनिष्ठा मनी धरून घोडखिंडीत धारातीर्थी पडून त्यास पावन करणाऱ्या बाजी प्रभू देशपांडे, बांदल सेना आणि कैक निर्भिड रग्गड मावळ्यांना शिलेदार परिवार आणि टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी पावनखिंडीत वंदन केले.

या मोहिमेची सुरवात वीर शिवा काशिद आणि वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या पन्हाळगडावरील स्मारकासामोर नतमस्तक होऊन झाली. पन्हाळगड, तुरुकवाडी, म्हाळुंगे गाव, मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी, चापेवाडी, मांडलाईवाडी, धनगरवाडी, कर्पेवाडी, आंबेवाडी, कळकवाडी, रिंगेवाडी, पाटेवाडी, सुकामाचा धनगरवाडा, म्हसवडे, धनगरवाडी, पांढरपाणी, पावनखिंड अशी ही तब्बल ५० किलोमीटरची ऐतिहासिक पायवाट मार्गक्रमण केल्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्याून शिवरायांना पन्हाळगडावरून विशाळगडावर सुखरूप घेऊन जाणाऱ्या त्या रणधुरंधर मावळ्यांपैकी आपणच एक आहोत असा आभास गिर्यारोहकांना झाला.

खिंडीत पोहोचल्यावर “स्वराज्य रक्षणासाठी मरण आले तरी बेहत्तर पण आमचा पोशिंदा जगला पाहिजे” अशी स्वामीनिष्ठा मनी धरून या पवित्र ठिकाणी धारातीर्थी पडलेल्या स्वराज्य रक्षक मावळ्यांना भगवा स्वराज्य ध्वज हाती घेत, “जय भवानी जय शिवराय”, “हर हर महादेव” या घोषणा देत वंदन केले.

दिवसभर पडणारा मुसळधार पाऊस, धुक्यात हरवलेला परिसर, काही ठिकाणी वाडी-वस्ती तर काही ठिकाणी भात शेतीतून असणारे निसरडे गुडघाभर चिखलमय रस्ते आणि काही ठिकाणी शेवाळलेले दगडी रस्ते, अंधारमय व घनदाट जंगल, भरभरून वाहणारे ओढे नाले, जळू, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात अवधूत चाळके, प्रीतम चौगले, शैलेश जाधव, अंकुश कुंभार, प्रदीप मदने, संजय सावंत, दिपक परीट, कपील सुतार, फैयाज मणेर, प्रशिल अंबाडे आणि डॉ.समीर भिसे हे शिवभक्त गिर्यारोहक पावनखिंडीत नतमस्तक झाले.

आषाढी एकादशीनिमित्त शाळांमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा

आंबेगाव –  तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब, एकलहरे, विठ्ठलवाडी, नांदूर, टाकेवाडी,चांडोली,महाळुंगे, साकोरे,चास आदी शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पवित्र एकादशीचे औचित्य साधून पंचक्रोशीतील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

शाळेतील बाल वारकऱ्यांनी वारकरी वेशभूषा करून खांद्यावर पताका,मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन, मुलांनी गळ्यात तुळशीमाळा, टाळ मृदुंग, परवाद व पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात शाळेच्या परिसरात वारकरी सोहळा साजरा केला.

यावेळी शाळेतील मुलांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत शाळेच्या आवारात प्रभातफेरी काढून कळंब गावात असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मुलांनी विठुनामाचा गजर केला. याप्रसंगी लहान मुलींनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. वारीनिमित्त मुलांनी विठ्ठल मंदिरामध्ये हरीनामा चा गजर, भजन, पसायदान करीत आपली मनोगते व्यक्त केली.बाल वारकरी सोहळ्यानिमित्त शाळेतील वातावरण भक्तीमय झाले होते. आषाढी एकादशीचे महत्त्व यानिमित्त शाळेतील मुलांना कळाल्यावर पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.आषाढी सोहळा पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाळुंगे पडवळ याठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने काढण्यात आलेल्या वारकरी दिंडी चे हुतात्मा बाबू गेनू चौकात ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी लहान बाल वारकरी मुलांनी रिंगण सोहळा करून उपस्थितांची पालक व ग्रामस्थांची मने जिंकली.

कळंब येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेल्या आषाढी वारीचे उत्कृष्ट चे नियोजन शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव ,आदर्श शिक्षक संतोष कानडे, गणेश लोहकरे, शिक्षिका मीना निऱ्हाळी, गीतांजली शेलार यांनी केले.

बैलगाडा शर्यंतीचा थरार आता रुपेरी पडद्यावर

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्टयातील सर्वसामान्य कुटुंबातील घोडेगाव (ता आंबेगाव)येथील ऐश्वर्या दौड प्रमुख भूमिकेत झळकणार रुपेरी पडद्यावर, आदित्येराजे मराठे प्रोडक्शन निर्मित “नाद एकच बैलगाडा शर्यत” ह्या मराठी चित्रपटाच्या रुपाने.

या चित्रपटात बैलगाडा मालक व बैलगाडा शर्यत यांच्या संघर्षावर चित्रिकरण करण्यात आले आहे.सदरच्या चित्रपटात आदित्यराजे मराठे, ऐश्वर्या दौंड,अनिल नगरकर, राजेंद्र जाधव या प्रमुख कलाकारांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. तसेच पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुक्यातील,चास, घोडेगाव येथुन नवोदित कलाकारांना या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच चास, घोडेगाव, सातारा, सासवड या ठिकाणी पुर्ण झाले असून सदर चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन सागडे यांनी केले असुन निर्माता अदित्यराजे मराठे हे आहे. या चित्रपटात सुंदर अशी चार गिते साकारली गेली आहे त्यातील काही गाण्यांना सुंदर असा प्रतिसाद अत्ता पासूनच आहे “नाद एकच बैलगाडा शर्यंत” या गाण्याला सोशल मिडियावर ४० लाखाच्या पुढे व्हिव्यूज मिळाले आहे.

घोडेगाव येथील एका शेतकरी कुंटूबांतील कन्या ऐश्वर्या मारुती दौंड ही प्रमुख अभिनेत्री म्हणून अवघ्या २३ वर्ष वयातच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या आधी तीने घोडेगाव परिसरात चित्रीकरण झालेल्या रावडी या मराठी चित्रपटात छोटीशी भुमीका साकारली होती.

 अंगात कलागुण असल्याचे तिची आई संगीता मारुती दौंड यांनी ओळखले होते ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर ती याक्षेत्रात वळाली,अगदी कमी वेळातच जनतेच्या पसंतीस उतरली असून आता लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार असल्याने तिच्या घरच्यांना तिच्यावर सार्थ अभिमान आहे.

मुंबई डिव्हिजन रेल्वे सुरक्षा बलाच्या बुलेट रॅलीचे लोणावळ्यात स्वागत

लोणावळा , श्रावणी कामत

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल रेल्वे मंत्रालयातर्फे “आजादी का अमृत महोत्सव ” साजरा केला जात आहे . या उपक्रमाबद्दल मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजन कडून जितेन्द्र श्रीवास्तव वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त रेल्वे सुरक्षा बल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनात्मक बुलेट रैली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 10 रोजी सुरु करण्यात आली ती आज दुपारी 3 वाजता लोणावळा येथे आल्यानंतर आरपीएफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सिंह व उपनिरिक्षक नंदलाल यादव , आरपीएफ चे सहाय्यक उपनिरीक्षक , लोणावळा आनंद जैसवाल यांनी बुलेट रैली मध्ये सामिल झालेल्या बल सद्स्यांचे पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन स्वागत केले.

तसेच लोणावळा येथील कैवल्य धाम शाळेच्या प्रिंसिपल आणि रणजीत सिंह वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरपीएफ लोणावळा यांच्या कडुन हिरवा झेंडा दाखवून बुलेट रैली ला कर्जत कडे रवाना केले , या निमीत्ताने शाळेतील विध्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल . राष्ट्रीय एकता व सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी बुलेट रैली ही लोणावळा प्रमाणेच सर्व महत्त्वाच्या स्थानकांवरून जाणार आहे.

19 वर्षीय पर्यटक भुशी धरणात बुडाला

श्रावणी कामत

लोणावळा : लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आलेला 19 वर्षीय पर्यटक भुशी धरणात बुडाला असल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली . या पर्यटकाचा शोध घेण्यासाठी लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्कू पथक घटनास्थळी दुपारीच दाखल झाले आहेत . अद्याप त्याचा शोध लागला नसून दुपारपासून त्याचा शोध सुरु आहे . साहिल सरोज ( वय 19 , रा . मुंबई ) असे या बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , साहिल आणि त्यांच्या ग्रुपचे सुमारे 250 पेक्षा अधिक सहकारी आज लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते . भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्याखाली भिजत असताना पाय घसरुन साहिल पडला व वाहून भुशी धरणात गेला आहे . अद्याप त्याचा शोध लागला नसून लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्कू पथक यांची युद्धपातळीवर शोध मोहीम सुरु आहे.