19 वर्षीय पर्यटक भुशी धरणात बुडाला

श्रावणी कामत

लोणावळा : लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आलेला 19 वर्षीय पर्यटक भुशी धरणात बुडाला असल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली . या पर्यटकाचा शोध घेण्यासाठी लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्कू पथक घटनास्थळी दुपारीच दाखल झाले आहेत . अद्याप त्याचा शोध लागला नसून दुपारपासून त्याचा शोध सुरु आहे . साहिल सरोज ( वय 19 , रा . मुंबई ) असे या बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , साहिल आणि त्यांच्या ग्रुपचे सुमारे 250 पेक्षा अधिक सहकारी आज लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते . भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्याखाली भिजत असताना पाय घसरुन साहिल पडला व वाहून भुशी धरणात गेला आहे . अद्याप त्याचा शोध लागला नसून लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्कू पथक यांची युद्धपातळीवर शोध मोहीम सुरु आहे.

Previous articleपांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेला एमक्युअर कंपनीतर्फे सीएसआर फंडातून शालोपयोगी वस्तूंचे वाटप
Next articleमुंबई डिव्हिजन रेल्वे सुरक्षा बलाच्या बुलेट रॅलीचे लोणावळ्यात स्वागत