पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेला एमक्युअर कंपनीतर्फे सीएसआर फंडातून शालोपयोगी वस्तूंचे वाटप

कुरकुंभ: सुरेश बागल

पांढरेवाडी( ता. दौंड) येथील कुरकुंभ एमआयडीसीमधील एमक्युअर कंपनीच्या वतीने सीएसआर फंडातून पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दप्तर व एक किट वाटप करण्यात आले.अशी माहिती कंपनीतील वरिष्ठ अधिकारी राहुल मोरगावकर यांनी दिली.

यावेळी एमक्युअर कंपनीतील युनिट हेड आनंदकुमार जैन, वरिष्ठ व्यवस्थापक अधिकारी राहुल मोरगावकर, क्वालिटी हेड चेतानंद पाठक, पांढरेवाडी गावचे सरपंच छाया नानासो झगडे, मुख्याध्यापक मच्छिंद्र रामगुडे, पोलीस पाटील विलास येचकर, ग्रामसेवक जालिंदर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष आरती शितोळे, माऊली निंबाळकर ,नितीन बनकर, शाळेतील सर्व शिक्षक, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरेवाडी येथे दप्तर वाटप करण्यात आले होते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कुरकुंभ एमआयडीसीतील कंपन्यांच्या माध्यमातून यावर्षीही दप्तर व एक किट यामध्ये पाच वह्या, एक कंपास पेटी, एक पाणी बॉटल एक पेन, एक जेवणाचा टिफिन, सिसपेन्सिल बॉक्स या किटमध्ये देण्यात आले. कंपनीने शाळेला शालोपयोगी वस्तूंची भेट दिल्याबद्दल सरपंच छाया झगडे यांनी कंपनीचे उत्कृष्ट पद्धतीने कौतुक करून आभार मानले.

Previous articleजैवविविधता जतन करण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचे- जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे
Next article19 वर्षीय पर्यटक भुशी धरणात बुडाला