जैवविविधता जतन करण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचे- जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे

उरुळी कांचन

ग्रामीण भागात वृक्ष, झाडे,झुडपे यांची वृक्षतोड थांबउन निसर्गाचा समतोल बिघडत आहे. जैव्य सृष्टी टिकून राहण्यासाठी जंगले व हिरवा पट्टा याचेअस्तित्व खुप मह्त्वाचे आहे.मानवी गरजा भागविन्यासाठी नैसर्गिक स्तोत्राचा बेसुमार ह्रास हाऊन पर्यावरणाचा समतोल बिघडुन वातावरणात बदल घडून तपमान, पाऊस यावर परिणाम झाला आहे सृष्टी, नैसर्गिक साखळी संतुलीत राखण्यासाठी जैव्य विविधता जतन करण्यासाठी वृक्षारोपण करने अत्यंत मह्त्वाचे आहे असे मत जेस्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यनी येथे व्यक्त केले संत यादव बाबा हायस्कूल च्या वतीने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन संस्थाचालक सौ विद्या यादव यानी केले .या प्रसंगी डॉ रविंद्र भोळे यांनी मत व्यक्त केले.

यावेळी विद्या यादव यांनी लक्ष्मीतरु ची झाडे वृक्षारोपनसाठी उपलब्ध करुन देऊन लक्ष्मीतरु वृक्षाबद्दल उपयुक्तता विषद करुन मानव जातिला हे झाड सर्वांगीण दृस्ठ्या उपयोगी ठरणार आहे असे प्रतिपादन केले.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन यांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद केले.कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुरेश कांचन, संस्थाचालक विद्या यादव, युवराज महाडिक , पुष्पा महाडिक, राम महाडिक, सारिका महाडिक, विकास कड, श्रीमती निर्मला महाडिक, गणपत कूंजिर, प्रभाकर जगताप, यांच्या सह शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Previous articleजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे शिक्षण प्रेरणादायी- सदाशिव गायकवाड
Next articleपांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेला एमक्युअर कंपनीतर्फे सीएसआर फंडातून शालोपयोगी वस्तूंचे वाटप