जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे शिक्षण प्रेरणादायी- सदाशिव गायकवाड

उरळी कांचन (ता.हवेली) येथील टिळेकर मळा, राजेगाव, खडकी रावणगाव, मसोबावाडी येथील शंभर गरीब गरजु विद्यार्थीना शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षण हे प्रेरणादायी आहे आम्ही देखील प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन येथपर्यंत पोचलो आयुष्यात दुसऱ्यांना आपलसं करण्यासाठी कोणतीही जादू करावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व मनापापासुन असणे गरजेचे आहे. स्वता:भोगलेल्या वेदनेची जाणिव प्रत्येकाला असावी जे आपण भोगल ते आत्ताच्या पिढीला नको म्हणून आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून नामदेव भोसले जे काम करतात ते प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने आपल्या गावातील गरीब पिडीत कुटुंबातील विद्यार्थीना मदत करावे असे मत पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड यांनी व्यक्त केले.

टिळेकर मळा प्राथमिक शाळा, खडकी रावणगाव गाव, राजेगाव, मसोबावाडी येथील गरीब पिडीत कष्टकरी कुटुंबातील शंभर विद्यार्थीना वह्या, पाटी, दप्तर, पेन, पेन्सिल कंपास, व शालेय बॅग शेवराई शेवाभावी संस्था व रोटी फाऊंडेशन, कडून देण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक, नामदेव ज्ञानदेव भोसले, उरुळी कांचन पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, समाजसेवक डॉ. रोहित माडेवार, मुख्याध्यापीका लिना शहा, ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र टिळेकर, सामाजिक कार्यकर्ता पोपटराव ताम्हाणे, आई शेवराई ज्ञानदेव पवार, काचंन मॅडम सर्व शिक्षक,विद्यार्थी मित्र व पालक उपस्थित होते.

Previous articleहेल्प फॉऊडेशनच्या वतीने जऊळके बु येथील ठाकरवाडी शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप
Next articleजैवविविधता जतन करण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचे- जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे