हेल्प फॉऊडेशनच्या वतीने जऊळके बु येथील ठाकरवाडी शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

राजगुरूनगर- भोसरी येथील सामाजिक संस्था म्हणुन कार्यरत असलेली हेल्प फाऊंडेशन यांच्या मार्फत खेड तालुक्यातील दुर्गम भागातील जऊळके बु ॥येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब वंचित आदिवासी समुदायातील विध्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेतील २५ विद्यार्थ्यांना वह्या ,पेन,पुस्तक कंपास , ड्रॉईंग नोट बुक, कलर्स तसेच पाणी बॉटल , वाटप करण्यात आले .

या प्रसंगी हेल्प फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री प्रविण मासिरे साहेब यांनी गरीब शैक्षणिक साहित्य पासुन वंचित राहू नये व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालु असावे आणि पटसंख्या टिकून राहावी या उद्देशाने हेल्प फॉउन्डेशनच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात येत असते . वरची ठाकरवाडी जि.प.शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थांना पुढील काळात हेल्प फाऊंडेशन च्या माध्यमातून मदत केली जाईल असे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री . रामचंद्र येवले सरांनी प्रास्तावीक करून हेल्प फाऊंडेशन सर्व सभासदांचे गुलाबपुष्प श्रीफळ देऊन स्वागत केले . कार्यक्रमासाठी किरण पवार साहेब, श्रीकांत वानखडे साहेब . हृतीक साकोरे साहेब गोपाळ धुमाळ साहेब ‘ रोहित धुमाळ . अमोल येवले साहेब तसेचजऊळके गावचे ग्राम पंचायत सदस्य सुरेश मेंगडे उपस्थित होते .

      यावेळी हेल्प फॉउन्डेशन चे अध्यक्ष श्री प्रवीण माझिरे यांनी मनोगत व्यक्त करतांना फाऊंडेशन करत असलेल्या विविध योजना यांची माहिती दिली . आजच्या कार्यक्रमातुन शालेय साहित्य वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लाख मोलाचा होता.

फॉउन्डेशनच्या माध्यमातून आजचा  शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा खरोखर गौरवास्पद असा उपक्रम आहे . क्रार्यक्रमाची सांगता शाळेचे मुख्याध्यापक श्री वल्लभ क्षिरसागर सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले . सर्व विद्यार्थ्यांना फाऊंडेशन च्या वतीनेखाऊ वाटप करण्यात आला

Previous articleनारायणगावात भर बाजारपेठेत मंदिराची दानपेटी फोडली
Next articleजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे शिक्षण प्रेरणादायी- सदाशिव गायकवाड