जुन्नरच्या आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे एक युवक ओढ्यात गेला वाहून

नारायणगाव (किरण वाजगे)

गेली पाच-सहा दिवसापासून राज्यात संततधार पाऊस सुरु आहे. जुन्नर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम आदिवासी भागातील गोद्रे येथील ओढ्याला आलेल्या पुरा मध्ये एकनाथ बबन रेंगडे ही व्यक्ती अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे ओढ्यात वाहत गेली. सुमारे १५ ते २० मिनिटे ओढ्याच्या पाण्यात वाहत जाऊन ही व्यक्ती ओढ्याच्या किनाऱ्याला मिळाली. सुदैवाने ती व्यक्ती बचावली असून त्यांना पायाला व गुढग्याला इजा झाली आहे.

गोदरे या ठिकाणी जिथे ही घटना घडली तेथे पूल बांधण्याची गावकऱ्यांनी अनेकदा मागणी केली होती. परंतु प्रशासनाने योग्य वेळी दखल न घेतल्यामुळे व पुल न झाल्यामुळे येथे काही जनावरे देखील वाहून गेल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.

दरम्यान पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या तसेच डोंगर उतारावर राहणाऱ्या व घाटमाथ्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Previous articleगुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा म्हणून महिला मैत्री ग्रुपच्या  वतीने मराठी शाळेस शोकेस कपाट भेट
Next articleवाघोली परिसरात सीएनजी पंप चालकाला चार जणांकडून मारहाण