वाघोली परिसरात सीएनजी पंप चालकाला चार जणांकडून मारहाण

विशेष प्रतिनीधी

वाघोली( तालुका-हवेली)परिसरात पुणे नगर महामार्गावरील खांदवे नगर येथील सी.एन.जी पंप चालक राजू भरत वारघडे यांना चार जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत राजू वारघडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ११/०७/२०२२ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान राजू वारघडे आपल्या पंपाच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे काम करत असताना पंपावर गाड्यांची खुप गर्दी असल्याने वाहनचालकांना लाईन मध्ये येण्यासाठी सांगत असताना एक मारुती इको गाडी अचानक लाईनच्या विरुद्ध बाजुने पंपावर आली.तेव्हा वारघडे यांनी गाडी चालक याला गाडी लाईन मध्ये पुढे घे असे सांगितले.तेव्हा त्याने सी.एन.जी भारायचा आहे,असे म्हणल्यानंतर वारघडे यांनी त्यास तुम्ही लाईन मध्ये या सी. एन. जी तुम्हाला जरुर मिळेल असे सांगितले.तेव्हा ती व्यक्ती राजू वारघडे यांना म्हणाली मी खांदवेनगरचा राहणारा आहे. तुम्ही मला ओळखत नाही का? असे म्हणुन राजू वारघडे यांच्याशी हुज्जत घालू लागल्याने वारघडे यांनी त्याला लाईन मध्ये सी.एन.जी भरायचा नसेल तर दुसरी कड़े भरुन घे असे सांगितले. तेव्हा त्याने वारघडे यांना “तु १० मिनिट थांब, तुला दाखवतो” असे म्हणुन धमकी देऊन तो गाडी घेऊन गेला. त्यानंतर १० ते १५ मिनिटांत परत मारुती इको गाडी पंपावर आली त्यामागुन बुलेट वरुन आणखी दोन इसम असे चारजण आले व त्यातील काळा शर्ट घातलेल्या इसमाने राजू वारघडे यांना शिवीगाळ सुरु केली व यानेच मला सी. एन. जी भरुन दिला नाही असे बाकीच्यांना सांगुन त्याच्या हातात असलेल्या कोणत्या तरी लोखंडी वस्तुने वारघडे यांच्या तोंडावर मारले तेव्हा वारघडे यांच्या तोंडातुन रक्त येऊ लागले. तेव्हड्यात त्याच्या बरोबर असलेल्या तिघांनी त्याच्या हातात असलेल्या लाकडाने देखील वारघडे यांना मारहाण करुन जखमी केले. त्यावेळे वारघडे यांचा मेव्हणा ऋषिकेश मनोहर पठारे हा वाचवण्यासाठी मध्ये आला असता त्यालाही त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले.यावेळी वारघडे यांनी कशीतरी त्यांच्यापासुन सुटका करुन पंपावर असलेल्या ऑफिसच्या बाथरुम मध्ये गेले.तेव्हा गोंधळ सुरु असताना तेथील कोणीतरी पोलीसांना फोन करुन बोलावले असता पोलीस त्याठिकाणी आले.पोलीसांची चाहूल लागतात ते सर्वजण पळून जावु लागले तेव्हा त्यातील एकाला पोलीसांनी पकडले व बाकी तीन जण पळून गेले. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संभाजी भाऊसाहेब सानप (रा.सोमेश्वर नगर, लोणीकंद,पुणे) असे सांगितले बाकीच्यांचे नाव विचारले असता त्याने महेश कंद( रा. बारावा मैल,लोणीकंद, पुणे) सुंदर कांबळे (रा. खांदवेनगर,वाघोली,पुणे) सागर पूर्ण नाव माहित नाही (रा. केडगाव अ.नगर) असे सांगितले.

याबाबत वारघडे यांनी संभाजी भाऊसाहेब सानप (रा. सोमेश्वर नगर,लोणीकंद, पुणे) महेश कंद (रा. बारावा मैल,लोणीकंद, पुणे) सुंदर कांबळे ( रा. खांदवेनगर, वाघोली,पुणे) ४) सागर पुर्ण नाव माहित नाही (रा. केडगाव अ.नगर) यांच्या विरुध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत.

Previous articleजुन्नरच्या आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे एक युवक ओढ्यात गेला वाहून
Next articleडॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्यासाठी व तंदुरुस्तीसाठी वेळ द्यावा : आ.अतुल बेनके