बैलगाडा शर्यंतीचा थरार आता रुपेरी पडद्यावर

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्टयातील सर्वसामान्य कुटुंबातील घोडेगाव (ता आंबेगाव)येथील ऐश्वर्या दौड प्रमुख भूमिकेत झळकणार रुपेरी पडद्यावर, आदित्येराजे मराठे प्रोडक्शन निर्मित “नाद एकच बैलगाडा शर्यत” ह्या मराठी चित्रपटाच्या रुपाने.

या चित्रपटात बैलगाडा मालक व बैलगाडा शर्यत यांच्या संघर्षावर चित्रिकरण करण्यात आले आहे.सदरच्या चित्रपटात आदित्यराजे मराठे, ऐश्वर्या दौंड,अनिल नगरकर, राजेंद्र जाधव या प्रमुख कलाकारांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. तसेच पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुक्यातील,चास, घोडेगाव येथुन नवोदित कलाकारांना या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच चास, घोडेगाव, सातारा, सासवड या ठिकाणी पुर्ण झाले असून सदर चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन सागडे यांनी केले असुन निर्माता अदित्यराजे मराठे हे आहे. या चित्रपटात सुंदर अशी चार गिते साकारली गेली आहे त्यातील काही गाण्यांना सुंदर असा प्रतिसाद अत्ता पासूनच आहे “नाद एकच बैलगाडा शर्यंत” या गाण्याला सोशल मिडियावर ४० लाखाच्या पुढे व्हिव्यूज मिळाले आहे.

घोडेगाव येथील एका शेतकरी कुंटूबांतील कन्या ऐश्वर्या मारुती दौंड ही प्रमुख अभिनेत्री म्हणून अवघ्या २३ वर्ष वयातच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या आधी तीने घोडेगाव परिसरात चित्रीकरण झालेल्या रावडी या मराठी चित्रपटात छोटीशी भुमीका साकारली होती.

 अंगात कलागुण असल्याचे तिची आई संगीता मारुती दौंड यांनी ओळखले होते ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर ती याक्षेत्रात वळाली,अगदी कमी वेळातच जनतेच्या पसंतीस उतरली असून आता लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार असल्याने तिच्या घरच्यांना तिच्यावर सार्थ अभिमान आहे.

Previous articleमुंबई डिव्हिजन रेल्वे सुरक्षा बलाच्या बुलेट रॅलीचे लोणावळ्यात स्वागत
Next articleआषाढी एकादशीनिमित्त शाळांमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा