आषाढी एकादशीनिमित्त शाळांमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा

आंबेगाव –  तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब, एकलहरे, विठ्ठलवाडी, नांदूर, टाकेवाडी,चांडोली,महाळुंगे, साकोरे,चास आदी शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पवित्र एकादशीचे औचित्य साधून पंचक्रोशीतील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

शाळेतील बाल वारकऱ्यांनी वारकरी वेशभूषा करून खांद्यावर पताका,मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन, मुलांनी गळ्यात तुळशीमाळा, टाळ मृदुंग, परवाद व पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात शाळेच्या परिसरात वारकरी सोहळा साजरा केला.

यावेळी शाळेतील मुलांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत शाळेच्या आवारात प्रभातफेरी काढून कळंब गावात असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मुलांनी विठुनामाचा गजर केला. याप्रसंगी लहान मुलींनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. वारीनिमित्त मुलांनी विठ्ठल मंदिरामध्ये हरीनामा चा गजर, भजन, पसायदान करीत आपली मनोगते व्यक्त केली.बाल वारकरी सोहळ्यानिमित्त शाळेतील वातावरण भक्तीमय झाले होते. आषाढी एकादशीचे महत्त्व यानिमित्त शाळेतील मुलांना कळाल्यावर पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.आषाढी सोहळा पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाळुंगे पडवळ याठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने काढण्यात आलेल्या वारकरी दिंडी चे हुतात्मा बाबू गेनू चौकात ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी लहान बाल वारकरी मुलांनी रिंगण सोहळा करून उपस्थितांची पालक व ग्रामस्थांची मने जिंकली.

कळंब येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेल्या आषाढी वारीचे उत्कृष्ट चे नियोजन शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव ,आदर्श शिक्षक संतोष कानडे, गणेश लोहकरे, शिक्षिका मीना निऱ्हाळी, गीतांजली शेलार यांनी केले.

Previous articleबैलगाडा शर्यंतीचा थरार आता रुपेरी पडद्यावर
Next articleबाजी प्रभू देशपांडेंना टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांचे पावनखिंडीत वंदन