Home Blog Page 96

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी स्वप्नील बापट ,दैनिक ‘केसरी’चे रुपेश कोळस चिटणीसपदी तर कार्यकारिणी सदस्यपदी अमोल बोरसे

उरुळी कांचन

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणूकीत (2022-23) दैनिक आज का आनंदचे स्वप्नील बापट यांची अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी सकाळचे पांडुरंग सरोदे यांची निवड करण्यात आली आहे. दैनिक केसरीचे रुपेश कोळस चिटणीसपदी तर कार्यकारिणीपदी अमोल बोरसे यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. प्रताप परदेशी आणि अ‍ॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष- स्वप्नील बापट (सकाळ), उपाध्यक्ष- गणेश कोरे (दै. अ‍ॅग्रोवन) संदीप पाटील (दै. नवराष्ट्र)सरचिटणीस- पांडुरंग सरोदे, (सकाळ) खजिनदार-अभिजित बारभाई (दै. महाराष्ट्र टाईम्स) चिटणीस- प्रसाद जगताप (दै. पुढारी), रूपेश कोळस- (दै. केसरी),कार्यकारिणी सदस्य-
अमोल बोरसे (केसरी,) प्रसाद पानसे (महाराष्ट्र टाईम्स), अविनाश पोफळे (अ‍ॅग्रोवन), सचिन गोरे (सामना), अनिल सावळे (सकाळ), धीरज ढगे (एएनआय चॅनेल), गणेश खळदकर (पुढारी,) नीलेश चौधरी (पुण्यनगरी,) दिगंबर शिंगोटे (महाराष्ट्र टाईम्स), आदित्य तानवडे (महाराष्ट्र टाईम्स)

दरड प्रवण क्षेञातील धोकादायक गावांसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची ट्रायबल फोरमची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

घोडेगाव- आंबेगांव तालुक्यातील आदिवासी दरड प्रवण क्षेत्रातील धोकादायक गावांबाबत तात्काळ उपाययोजना करावी याबाबत मागणी प्रांताधिकारी यांचे कडे ट्रायबल फोरम आंबेगांव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आंबेगाव तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी भागातील पोखरीअंतर्गत बेंढारवाडी, जांभोरी अंतर्गत काळवाडी नं. १ व नं. २, मेघोली, माळीणअंतर्गत पसारवाडी तसेच फुलवडेअंतर्गत भगतवाडी ही दरड प्रवण क्षेत्रातील गावे अत्यंत धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तसेच, त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता, परंतु अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही अद्याप या गावांचे पुनर्वसन झालेले नाही.

आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे ३१ जुलै २०१४ रोजी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १५१ जणांचा मृत्यू झाला. गाव व वाड्यावस्त्यांवरील ७४ पैकी ४४ घरे, पुरुष, महिला, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्यांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर शासनाने धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानुसार १४०० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालनालय भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यामार्फत करण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २३ धोकादायक स्थितीत असलेल्या गावांचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील पोखरीअंतर्गत बेंढारवाडी, जांभोरीअंतर्गत काळवाडी नं. १, व नं. २, मेघोली, माळीणअंतर्गत पसारवाडी तसेच फुलवडेअंतर्गत भगतवाडी या अत्यंत धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. पुनर्वसनासाठी काही ठिकाणी जागाही उपलब्ध झाल्या; परंतु त्या ठिकाणी अद्याप कामे झालेली नाहीत. सध्या अत्यंत मुसळधार पाऊस सुरू झहल्याने प्रशासनाने रेड अलर्ट दिला आहे तरीही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना अद्याप झाली नसल्याने या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते आहे. ज्या ठिकाणी जागेची सोय झालेली आहे निदान त्या ठिकाणी तरी उपाययोजना करावी, अशी मागणी ट्रायबल फोरम आंबेगाव मार्फत लेखी निवेदनाद्वारे प्रांत अधिकारी यांना करण्यात आली आहे.

सध्याची पावसाची स्थिति पाहून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तत्काळ धोकादायक गावांकडे उपाययोजना कराव्यात आदिवासी भागात पुन्हा माळीण सारखी दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी मागणी डॉ हरिश खामकरअध्यक्ष, ट्रायबल फोरम आंबेगाव यांनी केली आहे

बी.डी.काळे महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालय आणि घोडेगाव येथील वनविभाग यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, घोडेगावचे वनपाल श्री.टी. एन. कदम यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या महोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचे आयोजन केले होते.

या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या प्रसंगी,अधिक्षक श्री.अशोक काळे,मुख्य लिपिक श्री.गणेश काळे,श्री.बाळू काळे,आंबेगावचे वनपाल श्री.एस. के. बिरादार, आंबेगावच्या वनपाल श्रीमती एस. एम. बुट्टे, घोडेगावचे वनरक्षक श्री.एस.एस.तांदळे, सालचे वनरक्षक श्रीमती बी.डी. पटेकर, वनसेवक श्री.ए.एम.मते, श्री.डी.डी.पारधी, श्री. एस. डी. धुमाळ आणि महाविद्यालयाचे सेवक श्री.अण्णा काळे, श्री.मारूती दरेकर या वेळी उपस्थित होते. सीताफळ आणि चिंच रोपांच्या प्रजातींची लागवड या वेळी करण्यात आली.

शहीद कमांडो संतोष खटाटे यांच्या स्मरणार्थ वनराई तयार करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार – तहसीलदार तृप्ती कोलते पाटील

उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा गावातील मल्हार गडाच्या पायत्याशी आसलेली रामवाडी वस्तीतील खटाटे कुटुंबातील कै,पांडूरंग खटाटे यांचे सुपुत्र व सौ कल्याणी खटाटे यांचे पती ,शहिद कंमाडो संतोष उर्फ महादेव पांडूरंग खटाटे यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्या बोलत होत्या. यावेळी माहिती सेवा समितीचे माध्यमातून ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले शहीद कमांडो संतोष खटाटे देवराई वनराई प्रकल्प साकारण्याचे चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले त्यासाठी सर्व झाडे देऊन वनराई उभी करणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले.

उपस्थितामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्तीताई कोलते-पाटील , हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत वारघडे , शिरुर तालुका माहिती सेवा समिती अध्यक्ष धर्मराज बोत्रे , हवेली तालुका माहिती सेवा समिती अध्यक्ष कमलेश बहिरट, डॉ आनंद दरक, डॉ प्रतिक वानखडे, सरपंच सोनाली जवळकर, उपसरपंच मनिषा भोंडवे, माजी सभापती सपना वाल्हेकर, हवेती महिला अध्यक्ष सुरेखा ताई भोरडे ,जिल्हा उपाध्यक्षा शोभाताई हरगुडे, मुख्याध्यापक पवार सर, संतोष जवळकर, हवेली उपाध्यक्ष शिवाजीराव भोरडे , श्रीकांत पाटोळे, वाल्मिक जवळकर, श्रीहरी काळभोर, सुनिल आप्पा जवळकर, प्रकाश जवळकर, ग्रामसेवक पवार भाऊसाहेब, तलाठी कनिजे भाऊसाहेब, अनिल जगताप, सोनाली माकर, माजी सरपंच कैलास नाना खटाटे, कल्पना खटाटे, चिंतामण वाल्हेकर, पांडूरंग आबा खटाटे,प्रमोद वाल्हेकर, तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते.

धामणी हायस्कुल शाळेजवळील साकव पुलाचे काम अंतिम टप्प्यात

घोडेगाव-  मा.गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या तसेच महाविकास आघाडी सरकार आणि धामणी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून तसेच जि. प.मा.उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १ कोटी रु.निधी धामणी येथील मुख्य रस्त्यांच्या दोन साकव पुलांसाठी मंजूर झाला होता. या दोन्ही पुलांची कामे अंतिम टप्प्यात असुन हे दोन्ही पूल लवकरच वापरात येऊन अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटणार आहे. गेली काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पाऊस जर असाच सुरू राहील तर ओढ्यावर पूर परिस्थिती येऊ शकते. यामुळे शाळेत जाणाऱ्या तसेच नागरिकांसाठी हा पूल होणं गरजेचं होतं. या पुलाचे काम आता पूर्ण होत आले असून लवकरच तो काम पूर्ण होताच वाहतुकीसाठी सुरू केला जाईल.

वळसे पाटील तातडीने या ठिकाणी निधी टाकून काम ताबडतोब पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यांनी देखील चांगल्यापद्धतीने दर्जेदार काम करून घेतले आहे. याबद्दल धामणी, शिरदाळे, पहाडदरा,ज्ञानेश्वरवस्ती ग्रामस्थांनी तसेच पालकांनी आभार व्यक्त केले. अशी माहिती शिरदाळे गावचे युवा उपसरपंच मयुर सरडे यांनी दिली

वाघोलीच्या बसस्थानकाचे रुप पालटणार : ज्ञानेश्वर (माऊली) कटके

गणेश‌ सातव,वाघोली

वाघोली येथील बसस्थानकाच्या विकास कामाचा आराखडा (ब्लु प्रिंट) तयार करण्यात आला आहे. जि.प.सदस्य व शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर(माऊली) कटके यांनी आयुक्‍त विक्रम कुमार यांची भेट घेत सदर आराखड्यानुसार येथील स्थानक विकसीत करण्यात यावे,अशी मागणी निवेदन देऊन केली आहे. त्यानुसार पावसाने उघडीप दिल्यानंतर हे काम सुरू करण्याबाबतचे प्रयत्न केले जातील,असे आश्‍वासन आयुक्‍तांनी दिले आहे.
वाघोली बसस्थानकाचा विकास तसेच सुशोभिकरणाचे काम लवकरच मार्गी लागेल,असे कटके यांनी सांगितले.

वाघोली ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ग्रामपंचायतीच्यावतीने येथे अत्याधुनिक बसस्थानकासाठी दोन एकर जागा उपलब्ध करून दिली होती. परंतु, स्थानकात बसथांब्या व्यतिरीक्‍त अन्य कुठलेही काम अद्यापपर्यंत झालेले नाही. सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे पाणी साचून स्थानकात सर्वत्र चिखल झाला आहे. प्रवाशांना बसण्यासाठीच नव्हे तर अगदी उभे राहण्यासाठीही जागा नाही.स्थानकात येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नियोजीत आराखड्या प्रमाणे स्थानकाचे कॉंक्रिटीकरण, प्रवाशांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह,कॅंटीन अशा गोष्टी सुरू होणे अपेक्षित होते. परंतु,यामधील कोणतेच काम झालेले नाही.सदर बाब निदर्शनास आणून देत ज्ञानेश्‍वर कटके यांनी वाघोली बसस्थानक विकसीत करावे अशी मागणी केली आहे. पावसाळ्यानंतर सदर काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले आहे.

 

जीवनात शास्वत मार्ग सद्गुरुच दाखवितात – जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे

उरुळी कांचन

वेदांचे शिक्षण प्रथमतः महर्षी वेदव्यास मुनिनी दिले. म्हणून व्यासांच्या जयंती रुपात गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. व्यासपिठाचे उगमस्थान महर्षी व्यासांमुळेच प्रस्थापीत झाले. अश्या व्यासपिठावर अनेक गुरु जीवनात बहुमोल मार्गदर्शन करतात. गुरु अज्ञानातून ज्ञानाकडे, असत्यातून सत्याकडे व ह्या नस्वर जगाला चिर कालीन शांतीसाठी मार्ग दाखवितात. म्हणून गुरु हा संतकुळिचा राजा असुन शिष्यांचा प्राण विसावा असतो. जगात गुरु सारखे दैवत नाही. म्हणून जीवनात सद्गुरुची अत्यंत गरज असते. जिवन योग्य रितीने जगण्यासाठी व अत्मिक शांती साठी शास्वत मार्ग सद्गुरु दाख वितात असे मत जेष्ठ समाज सेवक डॉ रविंद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट निती आयोग ह्यानी येथे व्यक्त केले.

सद्गुरु जनसेवा विकास प्रतिष्ठान संचलीत संत यादव बाबा विद्यालय येथे गुरूपौर्णिमे निमीत्ताने कार्यक्रमाचे आयोजन, शिक्षकांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्या व शाला पयोगी वस्तुचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी मार्गदर्शन करताना डॉ रविंद्र भोळे यांनी मत व्यक्त केले.

प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन म्हणाले की डॉ रविंद्र भोळे ह्या परिसरातील नव्हे राज्यातील विविध क्षेत्रांतील समर्पित भावनेने कार्य करणारे कर्मयोगी, उपयोगी व्यक्तिमत्व आहे. डॉ रविंद्र भोळे प्रवचनकार, समाजसेवक असुन शाळेत अनेक वर्षा पासुन शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत तपासनी, वृक्षारोपण तसेच विविध कार्यात समर्पित भावनेने कार्य केलेले आहे.

या कार्यक्रमाला गुरुदत्त विकास सेवा प्रतिष्ठान संचलीत संत यादवबाबा माध्यमिक शाळेच्या संचलीका विद्या यादव, सौ पुष्पा महाडिक, श्रीमती सारिका महाडिक, विकाश कड, श्रीमती निर्मला महाडिक, शाळेतील सर्व शिक्षक वृन्द, श्री कोपनार सर, श्री विचारे सर,श्री गायकवाड सर,श्री कुंजिर सर, श्री लान्डे , श्री आंबेकर सर, कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थीत होते.

दौंड शहर कॉंग्रेस कमिटीची आगामी नगरपालिका निवडणूकी संदर्भात जिल्हा निरीक्षकांच्या उपस्थितित बैठक संपन्न

कुरकुंभ ;सुरेश बागल

आगामी दौंड नगरपालिका निवडणूकी संदर्भात दिनांक – १४-७-२२ रोजी दुपारी ३:०० वा. पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या आदेशाने पक्ष निरीक्षक व देहूरोड कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष हाजीमल्लंग मारीमुत्तु व दुसरे निरीक्षक अब्दुल गफूर शेख अध्यक्ष मावळ तालुका अल्पसंख्यक कॉंग्रेस कमिटी ह्यांच्या मार्गदर्शना खाली बैठक संपन्न झाली .सदर बैठकीत सर्व शहर पदाधिकारी व इच्छुक उमेद्वार उपस्थित होते सदर बैठकीत पक्षाची तालुक्यातील माहीती तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे ह्यानी सविस्तर मांडली, शहरातील आगामी नगरपालिका संदर्भात भूमिका व रणनीति शहराध्यक्ष हरेष ओझा ह्यानि मांडली. पक्ष निरीक्षकानी कार्यकर्ता व पदाधिकारी ह्यांची भूमिका मांडून जिल्हा अध्यक्ष व वरिष्ठा ना कळवण्याचे आश्र्वासन दिले.

सदर बैठकीत पर्यावरण जिल्हाध्यक्ष तन्मय पवार,शहर उपाध्यक्ष अतुल थोरात,सरचिटणीस विठ्ठल शिपलकर, अल्पसंख्यक उपाध्यक्ष सुरेश क्षिरसागर व पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणने मांडले .बैठकीचे सूत्र संचालन व प्रस्तावना अतुल जगदाळे ह्यानी केले .
कार्येक्रमाचे आयोजन शहर अध्यक्ष हरेष ओझा व सहकर्यानी केले.

तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयातर्फे जामीन मंजूर. अँड.निसार पठाण यांनी मांडली भक्कम बाजू

विशेष प्रतिनिधी

तांत्रिकदृष्ट्या फसवणुकीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयामध्ये अँड. निसार पठाण यांनी बाजू मांडत मुंबई उच्च न्यायालयातर्फे अटक पूर्व जामीन मंजूर करून देण्यास यश आले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादीची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले होते.अँड.निसार पठाण यांनी योगेश बाबासाहेब नवखंडे आणि रिया शिवकुमार शर्मा यांच्या बाजूने युक्तिवाद करत मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन मंजूर करून दिला आहे. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश,पुणे यांनी जामीन फेटाळला होता. मात्र तांत्रिकदृष्ट्या योग्य बाजू मांडत अँड.निसार पठाण यांनी न्यायालयात योग्य असा युक्तिवाद करत मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर करून दिला आहे.

काय तो वाघोलीचा बाजार,काय तो बाजारातील चिखल,काय ते कचरा व घाणीचे साम्राज्य,एकदमं ओकेचं !

आठवडे बाजारच्या दिवशी रस्त्यालगत बसणाऱ्या भाजीविक्रत्यांमुळे होतेयं वाहतूक कोंडी.

भौतिक सुविधा कोमातं(सुविधांचा अभाव),पावती विना वसूली मात्र होतेयं जोमातं.

गणेश सातव,वाघोली

गेले काही दिवसांपासून वाघोली परिसरात संततधार पाऊसाने जोर धरला असल्याने परिसरात ठिकठिकाणी पाणी साठून राहिल्याने दलदल निर्माण झाली आहे.वाघोलीचे बाजार मैदान व भाजी मंडई परिसरही याला अपवाद राहिला नाही.भाजीमंडई परिसरात यामुळे चिखल,गाळ व कुजलेल्या भाज्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यातचं बाजार मैदान व सिमाभिंतीलगत वारंवार टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे भटकी कुत्री व डुक्करांनी परिसरात आपली वसाहत निर्माण केली आहे.यामुळे बाजारात येताना नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.

अश्या अवस्थेमुळे “काय तो वाघोलीचा बाजार,काय तो बाजारातील चिखल,काय ते कचरा व घाणीचे साम्राज्य,एकदम ओकेचं!” अशी नागरिकांवर उपहासात्मक बोलण्याची वेळ आली आहे.

या सर्वात मात्र शेतकरी,खरेदीसाठी येणारे नागरिक,महिलावर्गाचे मात्र प्रचंड हाल होत असल्याचे पहायला मिळत आहे.या मंडई परिसरात कायमचं सामान्य सुविधांची वणावा असल्याने ऐन पाऊसाळ्यात शेतकरी,भाजीविक्रेते,नागरिकांना उघड्यावरचं लघुशंकेसाठी जावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

दर मंगळवारी आठवडे बाजाराच्या दिवशी पुणे-नगर महामार्गासह आव्हाळवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रेते आपला माल विकायला बसत असल्याने वाहतुक समस्येचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो.दुर्दैवाने तांत्रिक बिघडामुळे एखाद्या वाहनाचा ब्रेक लागला नाही अथवा मोठ्या गर्दीत नजरचुकीने वाहनांचा थोडा जरी धक्का लागला तर मोठा अपघातही होऊ शकतो.

साधारण १ वर्षापूर्वी जवळपास २२ गावांसह वाघोली हे गाव पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाले.ऐवढ्या दिवसांनंतर हि वाघोलीच्या भाजीमंडई परिसरात साधे स्वच्छता गृहाचे बांधकाम महानगरपालिकेचा संबंधित विभाग करु शकला नाही? हि खेदाची बाब आहे.पावती विना होत असणारी ‘बेकायदेशीर वसूली’ मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने जोमात सुरु असल्याची कुणकुण मात्र ऐकायला मिळत आहे.

तातडीने संबंधित विभागाने वाघोली भाजी मंडई व आठवडे बाजार मैदान परिसरातील समस्यांची दखल घेऊन मंडई परिसरात झालेल्या दलदलीच्या ठिकाणी मुरुम टाकावा व आजुबाजुला साचलेला कचरा उचलून स्वच्छता करावी. त्याचबरोबर किमान स्वच्छता गृह,पाणी अश्या भौतिक सुविधा तरी नागरिकांच्या व विक्रेत्यांच्या सोयीसाठी राबवाव्यात अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून होत आहे.