वाघोलीच्या बसस्थानकाचे रुप पालटणार : ज्ञानेश्वर (माऊली) कटके

गणेश‌ सातव,वाघोली

वाघोली येथील बसस्थानकाच्या विकास कामाचा आराखडा (ब्लु प्रिंट) तयार करण्यात आला आहे. जि.प.सदस्य व शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर(माऊली) कटके यांनी आयुक्‍त विक्रम कुमार यांची भेट घेत सदर आराखड्यानुसार येथील स्थानक विकसीत करण्यात यावे,अशी मागणी निवेदन देऊन केली आहे. त्यानुसार पावसाने उघडीप दिल्यानंतर हे काम सुरू करण्याबाबतचे प्रयत्न केले जातील,असे आश्‍वासन आयुक्‍तांनी दिले आहे.
वाघोली बसस्थानकाचा विकास तसेच सुशोभिकरणाचे काम लवकरच मार्गी लागेल,असे कटके यांनी सांगितले.

वाघोली ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ग्रामपंचायतीच्यावतीने येथे अत्याधुनिक बसस्थानकासाठी दोन एकर जागा उपलब्ध करून दिली होती. परंतु, स्थानकात बसथांब्या व्यतिरीक्‍त अन्य कुठलेही काम अद्यापपर्यंत झालेले नाही. सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे पाणी साचून स्थानकात सर्वत्र चिखल झाला आहे. प्रवाशांना बसण्यासाठीच नव्हे तर अगदी उभे राहण्यासाठीही जागा नाही.स्थानकात येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नियोजीत आराखड्या प्रमाणे स्थानकाचे कॉंक्रिटीकरण, प्रवाशांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह,कॅंटीन अशा गोष्टी सुरू होणे अपेक्षित होते. परंतु,यामधील कोणतेच काम झालेले नाही.सदर बाब निदर्शनास आणून देत ज्ञानेश्‍वर कटके यांनी वाघोली बसस्थानक विकसीत करावे अशी मागणी केली आहे. पावसाळ्यानंतर सदर काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले आहे.

 

Previous articleजीवनात शास्वत मार्ग सद्गुरुच दाखवितात – जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे
Next articleधामणी हायस्कुल शाळेजवळील साकव पुलाचे काम अंतिम टप्प्यात