धामणी हायस्कुल शाळेजवळील साकव पुलाचे काम अंतिम टप्प्यात

घोडेगाव-  मा.गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या तसेच महाविकास आघाडी सरकार आणि धामणी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून तसेच जि. प.मा.उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १ कोटी रु.निधी धामणी येथील मुख्य रस्त्यांच्या दोन साकव पुलांसाठी मंजूर झाला होता. या दोन्ही पुलांची कामे अंतिम टप्प्यात असुन हे दोन्ही पूल लवकरच वापरात येऊन अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटणार आहे. गेली काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पाऊस जर असाच सुरू राहील तर ओढ्यावर पूर परिस्थिती येऊ शकते. यामुळे शाळेत जाणाऱ्या तसेच नागरिकांसाठी हा पूल होणं गरजेचं होतं. या पुलाचे काम आता पूर्ण होत आले असून लवकरच तो काम पूर्ण होताच वाहतुकीसाठी सुरू केला जाईल.

वळसे पाटील तातडीने या ठिकाणी निधी टाकून काम ताबडतोब पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यांनी देखील चांगल्यापद्धतीने दर्जेदार काम करून घेतले आहे. याबद्दल धामणी, शिरदाळे, पहाडदरा,ज्ञानेश्वरवस्ती ग्रामस्थांनी तसेच पालकांनी आभार व्यक्त केले. अशी माहिती शिरदाळे गावचे युवा उपसरपंच मयुर सरडे यांनी दिली

Previous articleवाघोलीच्या बसस्थानकाचे रुप पालटणार : ज्ञानेश्वर (माऊली) कटके
Next articleशहीद कमांडो संतोष खटाटे यांच्या स्मरणार्थ वनराई तयार करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार – तहसीलदार तृप्ती कोलते पाटील