जीवनात शास्वत मार्ग सद्गुरुच दाखवितात – जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे

उरुळी कांचन

वेदांचे शिक्षण प्रथमतः महर्षी वेदव्यास मुनिनी दिले. म्हणून व्यासांच्या जयंती रुपात गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. व्यासपिठाचे उगमस्थान महर्षी व्यासांमुळेच प्रस्थापीत झाले. अश्या व्यासपिठावर अनेक गुरु जीवनात बहुमोल मार्गदर्शन करतात. गुरु अज्ञानातून ज्ञानाकडे, असत्यातून सत्याकडे व ह्या नस्वर जगाला चिर कालीन शांतीसाठी मार्ग दाखवितात. म्हणून गुरु हा संतकुळिचा राजा असुन शिष्यांचा प्राण विसावा असतो. जगात गुरु सारखे दैवत नाही. म्हणून जीवनात सद्गुरुची अत्यंत गरज असते. जिवन योग्य रितीने जगण्यासाठी व अत्मिक शांती साठी शास्वत मार्ग सद्गुरु दाख वितात असे मत जेष्ठ समाज सेवक डॉ रविंद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट निती आयोग ह्यानी येथे व्यक्त केले.

सद्गुरु जनसेवा विकास प्रतिष्ठान संचलीत संत यादव बाबा विद्यालय येथे गुरूपौर्णिमे निमीत्ताने कार्यक्रमाचे आयोजन, शिक्षकांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्या व शाला पयोगी वस्तुचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी मार्गदर्शन करताना डॉ रविंद्र भोळे यांनी मत व्यक्त केले.

प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन म्हणाले की डॉ रविंद्र भोळे ह्या परिसरातील नव्हे राज्यातील विविध क्षेत्रांतील समर्पित भावनेने कार्य करणारे कर्मयोगी, उपयोगी व्यक्तिमत्व आहे. डॉ रविंद्र भोळे प्रवचनकार, समाजसेवक असुन शाळेत अनेक वर्षा पासुन शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत तपासनी, वृक्षारोपण तसेच विविध कार्यात समर्पित भावनेने कार्य केलेले आहे.

या कार्यक्रमाला गुरुदत्त विकास सेवा प्रतिष्ठान संचलीत संत यादवबाबा माध्यमिक शाळेच्या संचलीका विद्या यादव, सौ पुष्पा महाडिक, श्रीमती सारिका महाडिक, विकाश कड, श्रीमती निर्मला महाडिक, शाळेतील सर्व शिक्षक वृन्द, श्री कोपनार सर, श्री विचारे सर,श्री गायकवाड सर,श्री कुंजिर सर, श्री लान्डे , श्री आंबेकर सर, कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थीत होते.

Previous articleदौंड शहर कॉंग्रेस कमिटीची आगामी नगरपालिका निवडणूकी संदर्भात जिल्हा निरीक्षकांच्या उपस्थितित बैठक संपन्न
Next articleवाघोलीच्या बसस्थानकाचे रुप पालटणार : ज्ञानेश्वर (माऊली) कटके