दौंड शहर कॉंग्रेस कमिटीची आगामी नगरपालिका निवडणूकी संदर्भात जिल्हा निरीक्षकांच्या उपस्थितित बैठक संपन्न

कुरकुंभ ;सुरेश बागल

आगामी दौंड नगरपालिका निवडणूकी संदर्भात दिनांक – १४-७-२२ रोजी दुपारी ३:०० वा. पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या आदेशाने पक्ष निरीक्षक व देहूरोड कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष हाजीमल्लंग मारीमुत्तु व दुसरे निरीक्षक अब्दुल गफूर शेख अध्यक्ष मावळ तालुका अल्पसंख्यक कॉंग्रेस कमिटी ह्यांच्या मार्गदर्शना खाली बैठक संपन्न झाली .सदर बैठकीत सर्व शहर पदाधिकारी व इच्छुक उमेद्वार उपस्थित होते सदर बैठकीत पक्षाची तालुक्यातील माहीती तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे ह्यानी सविस्तर मांडली, शहरातील आगामी नगरपालिका संदर्भात भूमिका व रणनीति शहराध्यक्ष हरेष ओझा ह्यानि मांडली. पक्ष निरीक्षकानी कार्यकर्ता व पदाधिकारी ह्यांची भूमिका मांडून जिल्हा अध्यक्ष व वरिष्ठा ना कळवण्याचे आश्र्वासन दिले.

सदर बैठकीत पर्यावरण जिल्हाध्यक्ष तन्मय पवार,शहर उपाध्यक्ष अतुल थोरात,सरचिटणीस विठ्ठल शिपलकर, अल्पसंख्यक उपाध्यक्ष सुरेश क्षिरसागर व पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणने मांडले .बैठकीचे सूत्र संचालन व प्रस्तावना अतुल जगदाळे ह्यानी केले .
कार्येक्रमाचे आयोजन शहर अध्यक्ष हरेष ओझा व सहकर्यानी केले.

Previous articleतांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयातर्फे जामीन मंजूर. अँड.निसार पठाण यांनी मांडली भक्कम बाजू
Next articleजीवनात शास्वत मार्ग सद्गुरुच दाखवितात – जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे