तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयातर्फे जामीन मंजूर. अँड.निसार पठाण यांनी मांडली भक्कम बाजू

विशेष प्रतिनिधी

तांत्रिकदृष्ट्या फसवणुकीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयामध्ये अँड. निसार पठाण यांनी बाजू मांडत मुंबई उच्च न्यायालयातर्फे अटक पूर्व जामीन मंजूर करून देण्यास यश आले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादीची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले होते.अँड.निसार पठाण यांनी योगेश बाबासाहेब नवखंडे आणि रिया शिवकुमार शर्मा यांच्या बाजूने युक्तिवाद करत मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन मंजूर करून दिला आहे. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश,पुणे यांनी जामीन फेटाळला होता. मात्र तांत्रिकदृष्ट्या योग्य बाजू मांडत अँड.निसार पठाण यांनी न्यायालयात योग्य असा युक्तिवाद करत मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर करून दिला आहे.

Previous articleकाय तो वाघोलीचा बाजार,काय तो बाजारातील चिखल,काय ते कचरा व घाणीचे साम्राज्य,एकदमं ओकेचं !
Next articleदौंड शहर कॉंग्रेस कमिटीची आगामी नगरपालिका निवडणूकी संदर्भात जिल्हा निरीक्षकांच्या उपस्थितित बैठक संपन्न