बी.डी.काळे महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालय आणि घोडेगाव येथील वनविभाग यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, घोडेगावचे वनपाल श्री.टी. एन. कदम यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या महोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचे आयोजन केले होते.

या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या प्रसंगी,अधिक्षक श्री.अशोक काळे,मुख्य लिपिक श्री.गणेश काळे,श्री.बाळू काळे,आंबेगावचे वनपाल श्री.एस. के. बिरादार, आंबेगावच्या वनपाल श्रीमती एस. एम. बुट्टे, घोडेगावचे वनरक्षक श्री.एस.एस.तांदळे, सालचे वनरक्षक श्रीमती बी.डी. पटेकर, वनसेवक श्री.ए.एम.मते, श्री.डी.डी.पारधी, श्री. एस. डी. धुमाळ आणि महाविद्यालयाचे सेवक श्री.अण्णा काळे, श्री.मारूती दरेकर या वेळी उपस्थित होते. सीताफळ आणि चिंच रोपांच्या प्रजातींची लागवड या वेळी करण्यात आली.

Previous articleशहीद कमांडो संतोष खटाटे यांच्या स्मरणार्थ वनराई तयार करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार – तहसीलदार तृप्ती कोलते पाटील
Next articleदरड प्रवण क्षेञातील धोकादायक गावांसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची ट्रायबल फोरमची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी