मानव विकास परिषदेच्या आंबेगाव तालुकाध्यक्षपदी राम फलके यांची निवड

आंबेगाव तालुक्यातील अमोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते राम सोपान फलके यांची मानव विकास परिषदेच्या आंबेगाव तालुका अध्यक्ष पदी नव्याने निवड करण्यात आली. मानव विकास परिषद म्हणजे शोषित, श्रमिक, पोलिस कोठडीत मृत्यु बेकायदेशिर अटक शोषण गुलामगिरी दहशत मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याच प्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक मानवी हक्कांचे उल्लंघन शासकीय आधिकाराचा गैरवापर,भांडवलशाही कडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील आहेत व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत आहे

मानव विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांच्या आदेशाने व राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक चौधरी ,राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे,व प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर व प्रदेश सचिव डॉ सचिन सूर्यवंशी व प्रदेश कार्याध्यक्ष असलम सय्यद, युवा प्रदेशाध्यक्ष अंकुर कदम, जयश्री अहिरे मॅडम महिला प्रदेश अध्यक्ष. संमतीने अन्सार शेख राष्ट्रीय संपर्कप्रमुख तसेच संस्थेचे खजिनदार अलीम सय्यद यांच्या सहमतीने यांच्या प्रर्यत्नाने राम सोपान फलके यांना आंबेगाव तालुकअध्यक्ष या पदी दि १३ / ७ / २० २२ ते १३ / ७ / २० २३ या कालावधी करीता त्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांचे.मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous articleबाजी प्रभू देशपांडेंना टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांचे पावनखिंडीत वंदन
Next articleगुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा म्हणून महिला मैत्री ग्रुपच्या  वतीने मराठी शाळेस शोकेस कपाट भेट