Home Blog Page 6

सिहंगड इन्सिट्युत ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षिका व विद्यार्थीनींनी अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन साजरा

श्रावणी कामत,लोणावळा

लोणावळा येथे सिहंगड इन्सिट्युट ऑफ हॉटेल मेनेजमेंट च्या शिक्षिका व विद्यार्थी निने लोणावळा शहर सिटी पोलीस स्टेशन ला रक्षाबंधन साजरा केला त्या विद्यार्थी च असं मत कि जी खाकी आपले रक्षण करते आपल्या संरक्षणासाठी रात्र दिवस तत्पर असतें. सण असो कि नसो पण समाजासाठी कर्तव्य पालन करतात.

या अटूट नात जपण्यासाठी सिहंगड च्या विद्यार्थीनी व शिक्षिका यांनी पोलीस कर्मचारी, वोर्डन, ट्रॅफिक ऑफिसर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. या वेळी प्रो. भाग्यश्री दाशमुखे, प्रो. कल्पना जाधव,वैष्णवी जाधव, दिक्षा आभापे, संपदा मोरे, श्रेया भागत, श्रुती कांबळे तसेच क्राईम रिपोर्टर वेलफेयर असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार श्रावणी कामत उपस्थित होते.

सकाळ सोशल फाउंडेशन,सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांचे वतीने शालेय १५ मुलींना सायकलींचे मोफत वाटप


घोडेगाव – मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित जनाता विद्या मंदिर घोडेगाव येथे सकाळ सोशल फाउंडेशन,सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांचे वतीने भागशाळा सालगाव व श्री मुक्ताई प्रशाला पिंपळगाव घोडे येथील मुलींना एकूण पंधरा सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे,स्नेहल चोरडिया,राहुल गरुड,वरिष्ठ व्यवस्थापक सकाळ सोशल फाउंडेशन व विशाल सराफ एन आय इ सकाळ सहव्यवस्थापक हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे होते.सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष शामशेठ होनराव,संस्थेचे कार्याध्यक्ष व समन्वय समितीचे चेअरमन राजेश काळे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बाळासाहेब काळे, संस्थेचे विद्यमान सचिव अक्षय काळे,संस्थेचे संचालक अजित काळे,जयसिंग काका काळे हे उपस्थित होते.

तसेच आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सविता माळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पर्यवेक्षक अनिल काळे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अविनाश कळंबे सर यांनी मानले.

नर्मदे हर परिवारा तर्फे जनता विद्या मंदीर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू साहित्य भेट

मोसीन काठेवाडी, घोडेगाव

मंचर येथील साई सेंट्रल मॉल,साई फर्निचरचे मालक उद्योजक तसेच शरद सहकारी बँकेचे संचालक,नर्मदे हर परिवाराचे सदस्य अजयशेठ घुले यांनी नर्मदे हर परिवारा मार्फत आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित जनता विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नविन डेस्क भेट दिला आहे.

या प्रंसगी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे,नर्मदे हर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर,उद्योजक धनंजय काळे,घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे, गजानन नाना काळे,महेश बोराडे, संजय मावळे ,रमेश काळे,मोसीन काठेवाडी,उदय नांगरे,आतुल गडकरी,सिध्देश काळे,सुजल काळे, प्राचार्य अविनाश काळंबे,उपप्राचार्य धनंजय पातकर,उपप्राचार्य अनिल काळे सर, शाम वाघमारे आदि सह शालेय विदयार्थी उपस्थित होते.

लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश रायकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला वॉटर प्युरिफायर भेट

नारायणगाव – (किरण वाजगे)

लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष ला. योगेश रायकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यात सकाळी न्याहारी कट्टा ग्रूपच्या माध्यमातून सुमारे १५० गरजू लोकांना सकाळी नाश्ता देण्यात आला, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे ला.डॉ.रविंद्र डुंबरे सर यांच्या सौजन्याने वॉटर प्युरिफायर सेट बसवून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी लायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन ला.शिरीष जठार,अध्यक्ष ला.योगेश रायकर,सचिव ला.राजेंद्र देसाई,खजिनदार ला.संजय शिंदे,प्रथम अध्यक्ष ला.विश्वास भालेकर,ला.दिपक वारुळे, जितेंद्र गुंजाळ, ला.मच्छिंद्र मुंडलिक,ला.मनोज भळगट,ला.अशोक खांडगे,ला.डॉ.रविंद्र डुंबरे,ला.शशिकांत वाजगे,ला.अजय चोरडिया,ला.संतोष जाधव,ला.संपत शिंदे,ला.विकास दरेकर,ला.जवाहर गुगळे,ला.डॉ. विलास नाईकोडी,ला.योगेश जुन्नरकर,ला.अजित वाजगे, ला.सुनिल चोरडिया,ला.दिलदीप बांगा, ला.सचिन भोर,ला.सचिन वऱ्हाडी,ला.डॉ.मयुरेश घाडगे, संदीप शिंदे, सचिन विश्वासराव, संतोष रासने, प्रशांत शिंदे, महेश शेटे, अशोक अण्णा खांडगे, संजय व-हाडी शेखर गायकवाड, उद्धव व-हाडी ,नामदेव वाणी, मुख्याध्यापिका वनिता हांडे, चेअरमन राजेश बाबुराव खांडगे, सतीश खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

बिबट्या बरोबर सेल्फी, त्याच्याबरोबर चालणे त्याच्या अंगावर हात फिरवण्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

नारायणगाव

बिबट्याच्या दहशतीची बातमी आपण सर्वत्र पाहिली असेल मात्र एका व्हायरल होत असलेल्या अनोख्या बिबट्याची बातमी आपण पाहणार आहोत…..

“बिबट्याने पोल्ट्री फार्म मध्ये घुसून शंभर कोंबड्यांना फस्त केले”. “मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारले. लहान मुलांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले” अशाप्रकारच्या बातम्यांमधून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत आपल्याला पहायला व ऐकायला मिळते.
बिबट्या प्रत्यक्ष समोर आल्यानंतर किंवा त्याला जवळ पाहिल्यानंतर त्रेधातिरपीट उडते, अनेकांची भंबेरी उडते.
परंतु प्रत्यक्षात जर बिबट्याच्या पाठीवर हात ठेवून त्याच्याबरोबर चालणे किंवा त्याच्याशी गप्पा मारणे, त्याच्याबरोबर सेल्फी, फोटो काढणे हा प्रकार फारसा ऐकिवात नाही मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
एक बिबट्या शेतातून जात असताना त्याच्यासोबत त्याच्या बरोबर चालून त्याच्या अंगावर हात फिरवून तसेच काहीजण त्याचा सेल्फी काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारे एका आजारी बिबट्याला सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांसमवेत आपण पाहिले आहे. त्यावेळी बिबट्याशी लगट करून त्याच्याबरोबर फोटो काढणे किंवा त्याच्याशी खेळणे अनेकांना महागात पडले होते कारण वनविभागाने अशा हौशी कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला होता. याच अनुषंगाने अशा प्रकारे फोटो काढणे तसेच त्याच्याशी लगट करणे या कार्यकर्त्यांना देखील महागात पडू शकते हाच वायरल व्हीडीओ आपल्या खास दर्शकांसाठी पाठवला आहे आपले प्रतिनिधी किरण वाजगे यांनी पाहुयात…

हातात कोयता घेवून दहशत करणाऱ्या एक जणाला अटक : आरोपीची येरवड्यात रवानगी

नारायणगाव :- (किरण वाजगे)
नारायणगाव येथील गोकुळ दूध डेअरी समोर हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन दहशत करणाऱ्या एक जणाला नारायणगाव पोलिसांनी रंगेहात पकडले.

बुधवार  दि. ३०) रोजी मध्यरात्री आरोपी राहुल रामअजोरे गौतम (वय २७, राहणार कोल्हे मळा, नारायणगाव) हा गोकुळ दूध डेअरी समोर कोल्हे मळा रस्त्यावर धारदार लोखंडी कोयता घेऊन दहशत करत असताना निदर्शनास आला याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला नारायणगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली. या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, हवालदार घोडे, मंगेश लोखंडे, शैलेश वाघमारे, दत्ता ढेंबरे, गोरक्ष हासे, थोरात, केंद्रे, कोतकर, कोळी यांच्या पथकाने केली या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील करीत आहेत.

थर्माकोल, प्लॅस्टिकचा वापर बंद करून वसुंधरेचे रक्षणासाठी पर्यावरणाच्या चळवळीत कार्यरत रहा : भारतीय मजदूर संघ

कुरकुंभ , सुरेश बागल

२८ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून देशभरात मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रात सेमिनार, मेळावे, वृक्षारोपण, जनजागृती च्या माध्यमातून भारतीय मजदूर संघाच्या वतीने साजरा केला जातो, याचाच भाग म्हणून भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने विश्वकर्मा भवन शनिवार पेठ पुणे येथे पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत “थं क्रिएटीव्ह पर्यावरण दक्षता मंच” चे अध्यक्ष श्री. प्रशांत अवचट प्रमुख वक्ते म्हणून होते, मंचावर भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. अर्जुन चव्हाण व पर्यावरण रक्षण मंच चे पुणे जिल्हा प्रमुख अभय वर्तक होते.

गेल्या काही वर्षात पर्यावरणा मध्ये मोठ्या प्रमाणात सतत बदल होत आहेत, ॠतुमानात बदल, पावसाचे बदललेल्या प्रमाण, तापमानात वाढ, ई बाबी मोठ्या प्रमाणात निसर्गात बदल होत आहेत, या परिणाम समाजात होतो आहे, प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या वापर केल्या मुळे, निसर्गाची हानी होते आहे.

जल प्रदुषण, जमीनीवर परिणाम होतो आहे. त्यामुळे पुर्नवापर होणारे वस्तूंच्या वापर करण्यासाठी जनजागृती करून अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही राहली पाहिजे असे मनोगत श्री. प्रशांत अवचट यांनी केले आहे. तसेच संत झानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आंळंदी ते पंढरपूर दिंडी मध्ये नैसर्गिकरीत्या पत्रावळ्या चा वापर करण्यात साठी जनजागृती करून महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

या वेळी अभय वर्तक यांनी प्रास्ताविक केले, व आभार प्रदर्शन अध्यक्ष श्री. अर्जुन चव्हाण यांनी केले आहे.

या कार्यक्रमात भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, कंत्राटी कामगार संघांचे उमेश आणेराव, ऊमेश विस्वाद, रविंद्र देशपांडे, विवेक ठकार , बेबीराणी डे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ‘चांद्रयान -३’ मोहिमेच्या लँडींगचा अनुभवला ऐतिहासिक क्षण

आंबेगाव ,मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुक्यातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ‘चांद्रयान -३’ मोहिमेच्या लँडींगचा ऐतिहासिक क्षण अनुभवला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) बहुचर्चित ‘चांद्रयान -३’ मोहिमेच्या लँडरने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लँडींग केले.हा ऐतिहासिक क्षण पाहता यावा यासाठी येथील शाळेत प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली होती.

 

 

यावेळी शाळेतील शिक्षक संतोष थोरात यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान मोहीमे बद्दल माहिती सांगितली.चांद्रयान-3 विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लँडींग केल्यावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तिरंगा झेंडा फडकावत व टाळ्या वाजवून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या.रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यामुळे तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्य उलगडण्यास मदत होणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी सांगितली.

घोडेगाव येथे नर्मद हर ग्रुप परिवारातर्फे ज्ञानेश्वरी सप्ताहाचे आयोजन

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

घोडेगावचे ग्रामदैवत श्री राजा हरिश्चंद्र महादेव सप्ताह निमित्त महिला भगिनींचे ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाले. या वेळी त्यांना ज्ञानेश्वरी ठेवण्याकरता नर्मदे हर परिवारा कडून व्यासपीठ देण्यात आले.

यावेळी नर्मदेहर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर, उदयोजक धनूशेठ काळे, प्रतिष्ठीत व्यापारी गजानन नाना काळे, बेल्हापूरकर ज्वेलर्सचे मालक निलेश बेलापूरकर,संजय मावळे, पोपटभाऊ काळे,शाम तात्या काळे,बाळासाहेब आनंदराव तसेच नर्मदेहर परिवाराचे सदस्य स्थानिक नागरिक भाविक – भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोडेगाव येथील जनता विद्या मंदीर शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

आंबेगाव ,मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुका विदया विकास मंडळ संचालित जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यामध्ये सकाळच्या पहिल्या सत्रात ज्यांचा जन्मदिवस म्हणून हा दिन साजरा केला जातो ते हॉकी या खेळाचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक राऊळ सर आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनंजय पातकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.दुसऱ्या सत्रामध्ये दिव्य ज्योती जागृती संस्थान या आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम राबविले जातात त्या अंतर्गत आरोग्य आणि दैनंदिन जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर दिव्य ज्योती जागृती संस्थान दिल्ली (शाखा चाकण) या संस्थेच्या साध्वी मांगल्या भारतीजी यांनी दैनंदिन जीवनातील ताणतणाव या विषयावर प्रयोगात्मक कार्यशाळा घेतली

. या कार्यक्रमासाठी आ. ता. वि. वि. मंडळ घोडेगाव, या शैक्षणिक संस्थेचे समन्वय समितीचे चेअरमन, राजेशशेठ काळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल पवार यांनी केले, तर आभार उजागरे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन फलके, कदम सर,कर्पे मॅडम,चव्हाण मॅडम,रंजना काळे मॅडम यांनी केले.