घोडेगाव येथील जनता विद्या मंदीर शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

आंबेगाव ,मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुका विदया विकास मंडळ संचालित जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यामध्ये सकाळच्या पहिल्या सत्रात ज्यांचा जन्मदिवस म्हणून हा दिन साजरा केला जातो ते हॉकी या खेळाचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक राऊळ सर आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनंजय पातकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.दुसऱ्या सत्रामध्ये दिव्य ज्योती जागृती संस्थान या आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम राबविले जातात त्या अंतर्गत आरोग्य आणि दैनंदिन जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर दिव्य ज्योती जागृती संस्थान दिल्ली (शाखा चाकण) या संस्थेच्या साध्वी मांगल्या भारतीजी यांनी दैनंदिन जीवनातील ताणतणाव या विषयावर प्रयोगात्मक कार्यशाळा घेतली

. या कार्यक्रमासाठी आ. ता. वि. वि. मंडळ घोडेगाव, या शैक्षणिक संस्थेचे समन्वय समितीचे चेअरमन, राजेशशेठ काळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल पवार यांनी केले, तर आभार उजागरे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन फलके, कदम सर,कर्पे मॅडम,चव्हाण मॅडम,रंजना काळे मॅडम यांनी केले.

Previous articleनारायणगाव पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई
Next articleघोडेगाव येथे नर्मद हर ग्रुप परिवारातर्फे ज्ञानेश्वरी सप्ताहाचे आयोजन