नारायणगाव पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

नारायणगाव, किरण वाजगे

नारायणगाव पोलिसांनी मोबाईल व मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ मोबाईल व ४ मोटर सायकल असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

पांडू बबन मुकने( वय ३५ वर्षे रा.चास नारोडी ता.आंबेगाव जि.पुणे )असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव असून
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या घरफोडीचे तसेच मोटासायकल चोरीचे गुन्हे दाखल होते. याबाबत योग्य तपास करण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नारायणगाव पोलीसांना सुचना दिल्या होत्या.

सहाय्यक पो. नि. महादेव शेलार यांना गोपनीय बातमीदार कडून माहिती मिळाल्यानुसार नारायणगाव येथील बाजारतळावरील पत्राशेडच्या जवळ एका संशईत इसमाकडे ४ मोटारसायकल दिसत असुन त्या चोरीच्या असल्याची शक्यता आहे.

या बातमीच्या आधारे स.पो. निरीक्षक शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश काठे,संतोष कोकणे,पोलीस नाईक मंगेश लोखंडे,पोलीस शिपाई शैलेश वाघमारे,संतोष साळुंके,हासे यांचे पथक तयार करून सदर बातमी मिळालेल्या ठिकाणी जावून संशयीत इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४ मोटारसायकल व २ अँन्ड्राॅइड मोबाईल हस्तगत करण्यात आले असून सदरच्या मोटार सायकलींबाबत व मोबाईल बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने मोटरसायकल नारायणगाव, ओतूर परिसरातून चोरल्या असल्याचे सांगितले तसेच त्याचे अंगझडतीमध्ये मिळून आलेल्या २ अँन्ड्रॉईड मोबाईल हे त्याने दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री नारायणगाव येथील कोल्हेमळा येथे राहणा-या भंगारवाल्यांच्या घरातून चोरी केले असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक मितेष घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरिक्षक विनोद धुर्वे, पो.हवालदार रमेश काठे,संतोष कोकणे,मंगेश लोखंडे,शैलेश वाघमारे,पोसंतोष साळुंके,दत्ता ढेंबरे, पोलीस हासे, चालक कोतकर तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे हवालदार राजू मोमीन, अतुल डेरे यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार काठे हे करीत आहेत.

Previous articleसार्वजनिक रक्षाबंधन कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा – गौरी बेनके
Next articleघोडेगाव येथील जनता विद्या मंदीर शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा