सार्वजनिक रक्षाबंधन कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा – गौरी बेनके

नारायणगाव :- (किरण वाजगे)
सार्वजनिक रक्षाबंधन कार्यक्रमातून एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळते असे प्रतिपादन ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या संचालिका गौरी अतुल बेनके यांनी केले.जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. तालुक्यातील अनेक गावातील महिला भगिनींनी आमदार बेनके यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत आपल्या भावाला अर्थात आमदार अतुल बेनके यांना राख्या बांधून हा सण आनंदात साजरा केला.

या कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या संचालिका गौरी अतुल बेनके यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्षा उज्वला शेवाळे, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका राजश्री वल्लभ बेनके, डॉक्टर पल्लवी बेनके, धनश्री बेनके व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .

भर पावसामध्ये हजारो महिलांनी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी उपस्थित राहून आपल्या भावा प्रति दाखवलेले प्रेम निश्चित प्रेरणादायी असून अशाप्रकारे सार्वजनिक रक्षाबंधन कार्यक्रमामधून एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळते. तालुक्यातील भगिनींनी दरवर्षीप्रमाणे या सामुदायिक रक्षाबंधन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अशा भावना यावेळी गौरी बेनके यांनी व्यक्त केल्या.उज्वला शेवाळे यांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार व्यक्त केले.

Previous articleउद्धव श्री” पुरस्कार सोहळ्याचे उद्या पिंपरी येथे अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण – ॲड. गौतम चाबुकस्वार
Next articleनारायणगाव पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई