सकाळ सोशल फाउंडेशन,सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांचे वतीने शालेय १५ मुलींना सायकलींचे मोफत वाटप


घोडेगाव – मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित जनाता विद्या मंदिर घोडेगाव येथे सकाळ सोशल फाउंडेशन,सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांचे वतीने भागशाळा सालगाव व श्री मुक्ताई प्रशाला पिंपळगाव घोडे येथील मुलींना एकूण पंधरा सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे,स्नेहल चोरडिया,राहुल गरुड,वरिष्ठ व्यवस्थापक सकाळ सोशल फाउंडेशन व विशाल सराफ एन आय इ सकाळ सहव्यवस्थापक हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे होते.सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष शामशेठ होनराव,संस्थेचे कार्याध्यक्ष व समन्वय समितीचे चेअरमन राजेश काळे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बाळासाहेब काळे, संस्थेचे विद्यमान सचिव अक्षय काळे,संस्थेचे संचालक अजित काळे,जयसिंग काका काळे हे उपस्थित होते.

तसेच आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सविता माळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पर्यवेक्षक अनिल काळे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अविनाश कळंबे सर यांनी मानले.

Previous articleनर्मदे हर परिवारा तर्फे जनता विद्या मंदीर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू साहित्य भेट
Next articleसिहंगड इन्सिट्युत ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षिका व विद्यार्थीनींनी अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन साजरा